जनरल उपेंद्र द्विवेदींकडून धिरजकुमार सातपुते यांना ‘वेटरन अचिव्हर अवॉर्ड’

04 Mar 2026 14:57:51
नागपूर
Veteran Achiever Award जनरल उपेंद्र द्विवेदीं यांच्या हस्ते क्राफ्ट्समेन धिरजकुमार सातपुते यांना ‘वेटरन अचिव्हर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. हा भव्य समारंभ मुंबईतील Colaba येथील सैन्य छावणीत पार पडला.भारतीय सैन्य दलाचे प्रमुख (Chief of the Army Staff) जनरल द्विवेदी यांनी सातपुते यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करत त्यांना सन्मानचिन्ह, सराहना पत्र व पदक प्रदान केले. महाराष्ट्रातील एकमेव मराठी माजी सैनिक म्हणून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
 
nagpur
 
यावेळी डी. एस. कुशवाहा (जनरल ऑफिसर कमांडिंग, महाराष्ट्र-गुजरात-गोवा एरिया) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच लेफ्टनंट कर्नल कमलप्रीत सग्गी, जेसीओ सुभेदार मेजर सरवण आर., सार्जंट एडमंड पीटर फ्रान्सिस आणि चीफ पेटी ऑफिसर शशी भूषण मिश्रा यांनाही त्यांच्या विशेष कार्यासाठी ‘वेटरन अचिव्हर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. Veteran Achiever Award धिरजकुमार सातपुते हे सेवेनंतरही महाराष्ट्रातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी निःस्वार्थपणे कार्यरत आहेत. युवक-युवतींना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ते शाळा, महाविद्यालयांत व्याख्याने देतात व समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.समारंभास कर्नल वेटरन श्रीनवेतू चॅटर्जी उपस्थित होते. यावेळी सातपुते यांनी नागपूर सब एरिया येथील कर्नल वेटरन नवनीत दुग्गल तसेच माजी कर्नल वेटरन संदीप शर्मा यांचे विशेष आभार मानले.सेवानिवृत्तीनंतर मिळालेला हा पुरस्कार सैनिकासाठी अत्यंत मानाचा आणि अभिमानास्पद सन्मान मानला जातो.
सौजन्य: संजीवनी येवले, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0