नवी दिल्ली
India warship deployment, मध्यपूर्वेत सध्या अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून, दोन्ही बाजूंमध्ये भीषण संघर्ष सुरु झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई आणि सागरी वाहतूक प्रणालीवर गंभीर परिणाम झाले आहेत, तर अनेक भारतीय नागरिकही मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अडकले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि समुद्रातील भारताच्या व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी भारताने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
भारतातील संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, मिशन डेप्लॉयमेंट अंतर्गत भारताने ओमानच्या आखातात आपली अत्याधुनिक युद्धनौका INS सूरत तैनात केली आहे. ही युद्धनौका फक्त एक जहाज नसून, भारताच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतीक मानली जाते. INS सूरतवर १६ ब्रह्मोस अँटी-शिप मिसाइल्स आणि ३२ मध्यम पल्ल्याच्या हवेत मारक क्षेपणास्त्रे तैनात आहेत. याशिवाय, जहाजाला शत्रूच्या रडारवर पकड न येता ऑपरेशन करण्याची क्षमता आहे. ७४०० टन वजनाचे हे युद्धनौका ३० नॉटिकल वेगाने धावू शकते, तसेच त्यात प्रगत टॉरपीडो लॉन्चर आणि पाणबुडीविरोधी रॉकेट यंत्रणा उपलब्ध आहेत.
मिशन डेप्लॉयमेंटची सुरुवात भारताने २०१७ मध्ये केली होती. या मिशनाचा मुख्य उद्देश संघर्षाच्या ठिकाणी कायमस्वरुपी आपली युद्धनौका तैनात करून नागरिकांची सुरक्षा आणि सागरी व्यापाराचे रक्षण करणे हा आहे. सध्या सुरू असलेल्या मध्यपूर्वेतील संघर्षामुळे भारताने ओमानच्या आखातात युद्धनौका पाठवली असून, होर्मुझची सामुद्रधुनी, ओमानचे आखात, अदन, सेशेल्स तसेच अंदमान-निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरावर भारत बारकाईने लक्ष ठेवत आहे.
युद्धामुळे आंतरराष्ट्रीय India warship deployment, विमान वाहतूक विस्कळीत झाली असून, मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. या परिस्थितीत भारताने आपली युद्धनौका तैनात करून नागरिकांचे सुरक्षित पत्ते सुनिश्चित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या नागरिकांची सुटका करण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्थाही सुरू करण्यात आली असून, दुबईत अडकलेले पहिले विमान मुंबईत सुरक्षित दाखल झाले आहे.मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केले असून, इराणनेही मिसाइल व ड्रोन हल्ल्यांद्वारे अमेरिका आणि तिच्या सहयोगींना घेरले आहे. यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत अस्थिरतेचे वातावरण पसरले असून, लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेविरोधातही इस्रायलचे युद्ध सुरु आहे. अशा परिस्थितीत भारताचे हे पाऊल नागरिकांचे आणि आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
भारताच्या या तैनातीने सागरी व्यापार मार्ग सुरक्षित ठेवण्यास मदत होईल, तर नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करून भारताची मध्यपूर्वेतील सामरिक उपस्थिती अधिक दृढ करण्यासही हातभार लागेल.