नवी दिल्ली,
indian-government-control-room पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशातील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्ली येथे विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला असल्याची माहिती मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. या नियंत्रण कक्षाचा उद्देश त्या भागात राहणाऱ्या किंवा अडकलेल्या भारतीय नागरिकांना तातडीची मदत करणे तसेच परिस्थितीबाबत मार्गदर्शन करणे हा आहे. हा कक्ष सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत कार्यरत राहणार असून नागरिकांसाठी दूरध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
मध्यपूर्वेतील संघर्ष तीव्र होत असताना अमेरिका आणि इस्रायलने इराणमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर परिस्थिती अधिकच चिघळली. indian-government-control-room इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे इराणी माध्यमांनी जाहीर केले. या घटनेनंतर प्रदेशात तणाव शिगेला पोहोचला असून हल्ले आणि प्रतिहल्ल्यांची मालिका सुरू झाली आहे.

इराणकडून इस्रायली मालमत्ता, अमेरिकन लष्करी तळ आणि आखाती भागातील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष्य केले जात असल्याचे वृत्त आहे. indian-government-control-room परिणामी संपूर्ण पश्चिम आशियात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बहरीन, इराण, इराक, इस्रायल, जॉर्डन, कुवैत, लेबनॉन, ओमान, कतार, पॅलेस्टाईन तसेच सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती येथील भारतीय दूतावासांनीही आपत्कालीन संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत, जेणेकरून अडचणीत सापडलेल्या भारतीयांना त्वरित मदत मिळू शकेल. भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून त्या भागातील भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. गरज भासल्यास पुढील उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, असे संकेत देण्यात आले आहेत.