दुबईत अडकलेल्या पुण्याच्या ८४ विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारची मदत

04 Mar 2026 13:40:41
पिंपरी
Indira College Dubai students stranded ताथवडे येथील इंदिरा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बिझनेसचे ८४ विद्यार्थी आणि ४ प्राध्यापक दुबईत अडकले होते. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ते दुबईला गेले होते; मात्र, अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) हवाई क्षेत्रातून विमान उड्डाणावर बंदी घालण्यात आली, ज्यामुळे सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक दुबईत अडकल्याचे वृत्त आहे.
 

Indira College Dubai students stranded 
मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी Indira College Dubai students stranded साडेसातच्या सुमारास दुबई येथून विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा विमान मुंबईकडे रवाना झाला. संबंधित सरकारी अधिकारी, भारतीय दूतावास, परराष्ट्र मंत्रालय, महाराष्ट्र शासन, पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासन आणि महाविद्यालय प्रशासन यांनी समन्वय साधून सुरक्षित परतीची व्यवस्था केली.विद्यार्थी व शिक्षक यांचे सुरक्षित आगमन सुनिश्चित करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने पालकांना ताथवडे येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई विमानतळावरून विद्यार्थ्यांना ताथवडे येथील महाविद्यालयात आणले जाणार असून, तेथे पालकांच्या स्वाधीन केले जाणार आहे.महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की दुबईत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ दिली नाही आणि त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. पालकांनी तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या यंत्रणा व प्रशासनाचे आभार व्यक्त केले.विद्यार्थ्यांची परत येणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले असून, युद्ध आणि हवाई क्षेत्र बंदीमुळे उद्भवलेल्या अडचणींवर यशस्वी मात करून प्रशासनाने सकारात्मक उदाहरण सादर केले आहे.
Powered By Sangraha 9.0