मध्यपूर्वेतील संघर्षाचा फटका महाराष्ट्राला; ड्रोन हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

04 Mar 2026 15:46:58
मुंबई, 
maharashtra-youth-dies-in-drone-attack गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला केला आहे, ज्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव वाढला असून नव्या युद्धाची सुरुवात झाली आहे. या युद्धाची झळ आता भारतालाही बसली असून विशेषत: मुंबईवर परिणाम झाला आहे. मुंबईतील एका तरुणाचा या संघर्षात मृत्यू झाला आहे.
 
maharashtra-youth-dies-in-drone-attack
 
मुंबईतील कांदिवली रहिवासी दीक्षित सोलंकी, वय २५, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात जागीच ठार झाला. हा हल्ला इराण-इस्रायल संघर्षाशी संबंधित असल्याचे संकेत आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षेची गंभीरता पुन्हा उजेडात आली आहे. दीक्षितचा मूळ जन्मस्थान दीव (गुजरात) असून तो काही वर्षांपूर्वी व्यवसायासाठी मुंबईत आला होता. maharashtra-youth-dies-in-drone-attack कांदिवली परिसरात राहणारा दीक्षित ‘MKD Vyom’ या ऑईल टँकरवर क्रू सदस्य म्हणून काम करत होता. टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने हल्ला केला, ज्यामुळे इंजिन रूममध्ये भीषण स्फोट झाला आणि आग लागली. या दुर्घटनेत दीक्षितचा मृत्यू झाला.
दीक्षित हा दीव येथील मच्छीमार व्यवसायिक अमृतलाल सोलंकी यांचा धाकटा मुलगा होता. काही महिन्यांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यसंस्कारानंतर तो पुन्हा जहाजावर कर्तव्यावर गेला होता, पण दुर्दैवाने त्याला मृत्यू गाठला. या घटनेपूर्वीच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘MV Skylight’ या जहाजावर हल्ला झाल्याची माहिती आहे. maharashtra-youth-dies-in-drone-attack या हल्ल्यात बिहारचा आशिष कुमार आणि राजस्थानचा दलीप सिंग हे दोन भारतीय खलाशी बेपत्ता झाले असून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत या दोन घटना आणि दीक्षितच्या मृत्यूमुळे तीन भारतीय खलाशांचा बळी गेला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0