एमसीएकडून वानखेडे स्टेडियमवरील ‘ऑनर्स बोर्ड’

04 Mar 2026 20:18:56
डॉ. यश काशीकर
मुंबई, 
wankhede-stadium : मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ने वानखेडे स्टेडियम येथील बाळासाहेब ठाकरे प्रेस बॉसमध्ये मुंबईतील क्रीडा पत्रकारांच्या सन्मानार्थ ‘ऑनर्स बोर्ड’ चे अनावरण केले. क्रिकेट व माध्यम क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत हा विशेष समारंभ उत्साहात पार पडला.
 
 

wankhede-stadium 
 
 
 
या ‘ऑनर्स बोर्ड’च्या माध्यमातून मुंबईतील क्रीडा पत्रकारांनी क्रिकेट या खेळाचा प्रचार आणि प्रसारासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यात आला आहे. अनेक दशकांपासून खेळाचे सातत्यपूर्ण वार्तांकन करून त्याची परंपरा व इतिहास जतन करणार्‍या माध्यम प्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
 
 
समारंभाचे उद्घाटन एमसीएचे अध्यक्ष अजिंय नाईक, सचिव प्रा. डॉ. उमेश खानविलकर व निलेश भोसले यांनी केले. यावेळी एपेस कौन्सिलचे सदस्य तसेच अनेक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार उपस्थित होते.
 
 
यावेळी अध्यक्ष अजिंय नाईक म्हणाले की, मुंबईच्या क्रिकेट परंपरेची उभारणी केवळ मैदानावरील खेळाडूंनीच केलेली नाही तर ती निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जिद्दीने या प्रवासाची नोंद करणार्‍या पत्रकारांनीही घडवली आहे. येथील क्रीडा पत्रकारांशी असलेले आमचे दीर्घकालीन नाते आम्हाला अभिमानास्पद वाटते. ‘ऑनर्स बोर्ड’ हा त्यांच्या योगदानाचा छोटा परंतु अर्थपूर्ण सन्मान असल्याचे ते म्हणाले.
 
 
सचिव प्रा. डॉ. उमेश खानविलकर यांनी क्रीडा पत्रकार अनेक वर्षांपासून मुंबई क्रिकेटचा अविभाज्य घटक राहिले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण वार्तांकनामुळे मुंबईच्या समृद्ध क्रिकेट वारशाचे जतन झाले असून खेळ अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचला आहे. या ‘ऑनर्स बोर्ड’ द्वारे त्यांच्या परिश्रमांचा आणि दीर्घ सहकार्याचा गौरव करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
 
 
या उपक्रमामुळे एमसीए व माध्यम क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होतील तसेच वर्षानुवर्षे मुंबई क्रिकेटला पाठिंबा देणार्‍यांचा सन्मान करण्याची परंपरा अधिक बळकट होईल, असा विश्वासही यावेळी व्यत करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे प्रेस बॉसमध्ये हा ऑनर्स बोर्ड कायमस्वरूपी प्रदर्शित राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0