मेंघाटोला येथे जनावरांचा गोठा जळून खाक

04 Mar 2026 18:23:28
गोंदिया,
Gondia cattle shed fire गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेंघाटोला येथील एका गोठ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली, या आगीत गोठ्यातील तणस व इतर शेतोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवार ते बुधवारच्या मध्यरात्री घडली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, या घटनेत शेतकरी सकटू सादू येरणे यांचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
 

Gondia cattle shed fire  
सोमवारी होळी आणि मंगळवार, ३ मार्च रोजी धुलिवंदन साजरे करण्यात आले. गावात आनंदाचे वातावरण होते, परंतु अचानक आग लागल्याच्या घटनेने गावात आनंदाचे क्षण नाराजीत बदलले. घटनेच्या रात्री शेतकरी सकटू येरणे यांचे कुटुंब जेवण झाल्यानंतर झोपले असताना त्यांची मुलगी मध्यरात्रीच्या सुमारास उठली असता तिला आग लागल्याचे दिसून आले. तिने आरडा ओरड केल्याने घरातील सर्वमंडळी व शेजारी जागे होत त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग इतकी भीषण होती की ती आटोक्यात आणणे कठीण झाले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल काही वेळातच घटनास्थळी पोहोचले, परंतु तोपर्यंत आगीत सर्व काही जळून खाक झाले होते. या घटनेत शेतकरी येरणे यांचे गोठ्यात ठेवलेल तणसाचे २०० वेट, शेतीचे साहित्य, लाकडाची चिराण जळून दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे कळू शकलेले नाही. घटनेची माहिती तलाठी व संबंधित विभागाला देण्यात आली असून शेतकरी येरणे यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0