सेंट जॉन्स एलुमनी क्रिकेट कप 2026 उत्साहात संपन्न

04 Mar 2026 18:18:02
नागपूर,
Moti Bagh Football Stadium नागपूरच्या मोती बाग फुटबॉल स्टेडियम येथे सेंट जॉन्स एलुमनी क्रिकेट कप 2026 मोठ्या उत्साहात पार पडला. स्पर्धेत शाळेच्या पारंपरिक हाउस पद्धतीनुसार रेड, ब्लू, ग्रीन आणि येलो या चार संघांनी सहभाग नोंदवला.
 

27 
 
 
स्पर्धेपूर्वी जर्सी अनावरण समारंभ शाळा परिसरात पार पडला. यावेळी प्राचार्य फादर विश्वास तोराणे, सुपरवायझर अभय तुलणकर, जेना मॅडम, रेबेका मॅडम तसेच सर्व खेळाडू आणि आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. Moti Bagh Football Stadium लीग पद्धतीने खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यांनंतर येलो हाउसने विजेतेपद पटकावले, तर ब्लू हाउस उपविजेता ठरला. प्रमुख अतिथी द.पू.म. रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह तसेच नियोग थेरपिस्ट डॉ. प्रवीण डबली यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.आयोजन समिती व कोर टीम सदस्यांच्या समन्वयामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. ही स्पर्धा केवळ क्रीडा सामना न ठरता मैत्री, ऐक्य आणि माजी विद्यार्थ्यांच्या एकोप्याचा उत्सव ठरली. गौरव मान, मनीष नायडू, अभिषेक अंबादे आणि आशीष देशपांडे यांचे विशेष योगदान लाभले.
सौजन्य : डॉ. प्रवीण डबली,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0