पुलगावात नपची सर्वसाधारण सभा रद्द

04 Mar 2026 19:52:44
पुलगाव,
municipal-council-general-meeting : नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष कविता ब्राम्हणकर यांच्या आदेशानुसार आज ४ रोजी आयोजित केली होती. परंतु नगरसेवक राज नागपाल यांच्या मुलाचा खुन झाल्यामुळे सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली.
 
 
kl
 
भरत नागपाल प्रसिद्ध व्यापारी व सामाजिक कार्यकर्ता होता. त्याची निघृण पद्धतीने हत्या करण्यात आली. ही माणुसकीला काळीमा फासणारी बाब असल्याचे सांगुन नगराध्यक्ष कविता ब्राम्हणकर आणि गटनेता प्रवीण पनीया यांनी दिलेल्या निवेदनाला सर्व सभासदानी अनुमती दर्शवत श्रद्धांजली सभा घेत तीन दिवसांचा दुखवटा करून सर्वसाधारण सभा रद्द करून पुढील आठवड्यात घेण्याचे ठरले. तसेच भरत नागपाल यांच्या हत्येची सखोल चौकशी करून आरोपींना शिक्षा करण्याची मागणीही या श्रद्धांजली सभेतून करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0