नागपूर गार्डन क्लबची बागकामावर रंगतदार कार्यशाळा

04 Mar 2026 13:40:48
नागपूर,
Nagpur Garden Club* नागपूरकरांच्या हिरव्या छंदाला नवी उमेद देण्यासाठी Nagpur Garden Club तर्फे ९ ते १२ मार्च २०२६ दरम्यान बागकाम विषयक विशेष आणि रंजक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.दररोज सायंकाळी ५.३० ते ७.१५ या वेळेत कार्यशाळा होणार असून, स्थळ आहे – नागपूर गार्डन क्लब, पहिला मजला, वेस्ट हायकोर्ट रोड, नागपूर (म्युनिसिपल कमिशनर यांच्या बंगल्यासमोर).
 
lili
 
चार दिवस चालणाऱ्या या उपक्रमात बागकामाच्या वेगवेगळ्या पैलूंवर मार्गदर्शन केले जाणार आहे.Nagpur Garden Club ९ मार्च: आकर्षक पुष्परचना – फुलांच्या सजावटीची कला प्रत्यक्ष शिकण्याची संधी १० व ११ मार्च: मूलभूत बागकाम – रोपांची निवड, कुंड्यांची काळजी, खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन १२ मार्च: वॉटर लीली आणि कमळ – पाणवनस्पतींची लागवड व संगोपनाचे तंत्र,.घरच्या बाल्कनीत छोटंसं गार्डन फुलवायचं असेल, टेरेस गार्डन तयार करायचं असेल किंवा फुलांच्या सजावटीत निपुण व्हायचं असेल – ही कार्यशाळा बागप्रेमींसाठी खास संधी आहे.
सौजन्य:नितीन दाते,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0