पुणे,
pratap sarnaik, मुंबई–पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळखले जाणारे राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) अत्याधुनिक आणि आरामदायी ‘शिवनेरी’ बससेवा आता फक्त या मार्गापुरती मर्यादित राहणार नाही. लवकरच ही सेवा महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यानही सुरु होणार असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले.
सन २००२ मध्ये सुरू झालेल्या ‘शिवनेरी’ बससेवेने सुरुवातीपासूनच प्रवाशांचा विश्वास जिंकला. उत्कृष्ट आसनव्यवस्था, सुरक्षित प्रवास आणि वेळेवर पोहोचण्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांमध्ये या सेवेची लोकप्रियता वाढली आहे. इतर बससेवेपेक्षा तिकीटदर थोडे अधिक असतानाही सातत्याने मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे ही सेवा सुरु झाल्यापासून नफ्यात असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
राज्यभर विस्तारासाठी एसटीच्या ताफ्यात २०० नवीन अत्याधुनिक व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस ताफ्यात येताच मुंबई–पुणे मार्गाव्यतिरिक्त नाशिक–पुणे, नाशिक–छत्रपती संभाजीनगर, नाशिक–जळगाव–धुळे, पुणे–कोल्हापूर, पुणे–सांगली, पुणे–सोलापूर, नागपूर–चंद्रपूर, नागपूर–अमरावती–अकोला अशा प्रमुख शहरांदरम्यानही ‘शिवनेरी’ सेवा सुरु होणार आहे. या विस्तारामुळे राज्याच्या विविध भागांतील प्रवाशांना आलिशान, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.सध्या दादर–स्वारगेट, दादर–शिवाजीनगर, बोरीवली–स्वारगेट, बोरीवली–शिवाजीनगर, ठाणे–स्वारगेट आणि ठाणे–शिवाजीनगर मार्गांवर पर्यावरणपूरक ई-शिवनेरी बससेवा सुरु असून प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन मार्गांवरही अशीच प्रतिक्रिया अपेक्षित असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.
महिलांसाठी pratap sarnaik, तसेच ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटदरात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शिवनेरी’ प्रवास पूर्णपणे विनामूल्य राहणार आहे.नवीन २०० बसेसमध्ये ३० शयनयान (स्लिपर) बसेसचा समावेश असेल. सध्या ज्या मार्गांवर वातानुकूलित नसलेली शयनयान सेवा उपलब्ध नाही, तिथे ‘स्लिपर शिवनेरी’ बस सुरू करून प्रवासी सेवेला अधिक उन्नत रूप देण्यात येणार आहे. आरामदायी बेड-कोच सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेमुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना उच्च दर्जाचा अनुभव मिळणार आहे.प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ‘शिवनेरी’चा हा राज्यभर विस्तार फक्त बससेवेचा विस्तार नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगत आणि गतिमान प्रवाससंस्कृतीची नवी दिशा दर्शवणारा टप्पा आहे.या निर्णयामुळे फक्त प्रवाशांनाच नव्हे, तर राज्याच्या पर्यटन आणि व्यावसायिक वाहतुकीला देखील मोठा चालना मिळेल, असा विश्वास प्रशासन व्यक्त करत आहे.