वर्धा,
agricultural mall पारंपरिक पिकांसोबतच जिल्ह्यातील अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. यामुळे निश्चितच शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. देश, विदेशात अधिक मागणी असणारे आणि कमी खर्चात उत्पादित होणारी नावीन्यपूर्ण पिके घेण्यास जिल्ह्यातील शेतकरी इच्छूक असल्यास अशा शेतकर्यांचे लस्टर तयार करण्यासोबतच त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सेलू येथे १८ एकरवर प्रस्तावित कृषी मॉल उभारणीचे सादरीकरण तसेच वर्धा व सेलू तालुयातील प्रयोगशील युवा शेतकर्यांसोबत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, साबांविचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, जिप बांधकामचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार आदी उपस्थित होते.
वर्धा व सेलू तालुयातील काही युवा शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. पालकमंत्री डॉ. भोयर यांनी त्या शेतकर्यांकडून प्रयोगाविषयी माहिती जाणून घेतली. विषमुत शेती करणारे शेतकरी, काही शेतकरी गावरान पपई, कलिंगड, खरबूज, रसाचा ऊस, स्ट्रॉबेरी, चिया, अश्वगंधा, फुलशेतीत निशिगंधा सारख्या पिकांचे उत्पादन घेतात. ही पिके घेणारे शेतकरी एकत्र आल्यास त्यांचे लस्टर करू, त्यांना बियाणे, विक्री व्यवस्थेसाठी सहकार्य करू, असेही ना. भोयर म्हणाले.
सेंद्रिय कृषी उत्पादने व त्यांच्या उपयुततेबाबत ग्राहकांना फारशी माहिती नाही. ग्राहक सेंद्रिय उत्पादनांचा पुरावा मागतात. त्यामुळे या उत्पादनांची तपासणी व प्रमाणपत्र वर्धेतच उपलब्ध व्हावे, अशी बाब शेतकर्यांनी उपस्थित केली. तशी व्यवस्था करण्याची सूचना ना. भोयर यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना केली.agricultural mall प्रयोगशील शेतकर्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे प्रयोग इतर शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शेतकर्यांशी प्रत्येक महिन्यात संवाद बैठक, कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण उत्पादने घेणार्या शेतकर्यांची गावस्तरावर कृषी सहाय्यक मार्फत यादी तयार करावी. तसेच गावस्तरावर शेतकर्यांना कृषी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सेलू येथे कृषी विभागाच्या १८ एकर जागेवर कृषी मॉल उभारणीचे प्रस्तावित आहे. त्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. बियाण्यांपासून बाजारापर्यंत हा प्रकल्प जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी आर्थिक समृद्धीचा कणा ठरणार आहे. यामध्ये इनपुट प्लाझा, धान्य आणि तेलबिया प्रक्रिया विभाग, फलोत्पादन आणि क्षमता बांधणी, कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रचर, लॉजिस्टिक आणि वाहतूक व्यवस्था, पब्लिक अॅमेनिटीज आणि बँकिंग, रिटेल आर्केड आणि बी-टू-सी दालन, शाश्वत ऊर्जा आणि सिंचन, सौर ऊर्जा प्रकल्प आदी राहणार आहे.