सॉ मिल, शेतातील बंड्याला भीषण आग

04 Mar 2026 16:50:40
समुद्रपूर,
saw mill farm fire गिरड येथील सॉ मिल आणि डोंगरगाव शिवारातील शेतातील बंड्याला आग लागून सागवान लाकूड, शेतातील साहित्य, ३५ विंटल कापूस जळून खाक झाला. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग कशाने लागली अद्याप कळू शकले नाही. गिरड येथील विष्णू भांदककर यांचे वनविभाच्या कार्यालयाच्या बाजूलाच सॉ मिल आहे. होळीच्या दिवशी २ रोजी मध्यरात्री या मिलच्या परिसरात अचानक आग लागली. आगीचे धूर दिसताच शेजार्‍यांनी विष्णू भांदककर यांना माहिती दिली.
 
 

saw mill 
 
 
नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोयात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोयात येईपर्यंत मिल परिसरात असलेले सागवान लाकूड, साहित्य व अन्य जळावू लाकूड जळून जवळपास २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरी घटना तालुयातील डोंगरगाव शिवारात धूलिवंदनाच्या दिवशी घडली. खुर्सापार जंगलालगतच्या डोंगरगाव शिवारातील शेतातील कापूस भरून असलेल्या बंड्याला अचानक आग लागली. या आगीत बंड्यात असलेला २५ विंटल कापूस आणि बंड्यालगत असलेल्या दोन एकरातील असा ३५ विंटल कापूस जळून खाक झाला. यामध्ये शेतकर्‍याचे जवळपास अडीच लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले. पिंपळा येथील शेतकरी भाऊराव दाते यांची डोंगरगाव शिवारात शेती असून शेतात बंडा आहे. या बंड्यात ३५ विंटल कापूस भरून ठेवण्यात आला होता. दरम्यान, ३ मार्चला दुपारी दीड वाजताच्या सुमारास बंड्याला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण बंड्याला कवेत घेतले. बंड्यात साठवून असलेला २५ विंटल कापूस तसेच शेती साहित्यांची राखरांगोळी झाली. ही आग इथेच थांबली नाही तर बंड्याला लागून असलेल्या शेतकर्‍याच्या दोन एकरातील कापूस सुद्धा जळून खाक झाला. घटनेची माहिती शेतकरी व गावकर्‍यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोयात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने पूर्ण राखरांगोळी केली होती.saw mill farm fire यामध्ये शेतकरी भाऊराव दाते यांचे अडीच लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तलाठी नंदनवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी भाऊराव दाते यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0