रंगपंचमीच्या दिवशी तरुणाचा वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

04 Mar 2026 12:27:42
आरमोरी,
shubham ramteke आरमोरी येथील गायकवाड चौकातील २५ वर्षीय शुभम नामदेव रामटेके याचा रंगपंचमीच्या दिवशी वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या या शोकदायी घटनेमुळे संपूर्ण वार्डात दुःखाचे वातावरण पसरले.

शुभम रामटेके 
 
 
शुभम रामटेके रंगपंचमीच्या दिवशी मित्रांसोबत रंग खेळल्यानंतर वैनगंगा नदीत आंघोळीला गेला होता. नदीत पाण्याची खोली समजून न घेतल्याने तो खोल भागात गेला आणि बुडाला. मित्रांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र वेळेवर त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि ग्रामीण रुग्णालयात पाठवला. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
शुभमने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते आणि सध्या पुण्यात एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता. त्याचे वडील कबाडी व्यवसायातून घर चालवत होते, मुलाच्या उज्वल भविष्यासाठी मोठ्या मेहनतीने शिक्षण दिले, पण नियतीला काही वेगळे मान्य होते. घरातील एकुलता एक मुलगा गमावल्याने वडील आणि आईवर मोठा धक्का बसला आहे.
परिसरात शुभमच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांनी नदीकिनारी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शुभम रामटेके, "जॉनी" म्हणून ओळखला जाणारा, शांत, मनमिळाऊ स्वभावाचा आणि कुटुंबासाठी मेहनत करणारा तरुण होता.shubham ramteke साधा कबाडीचा व्यवसाय करत असतानाही त्याने उच्च शिक्षण मिळवले आणि पुण्यात चांगल्या पदावर काम करत होता. अशा प्रतिभावान तरुणाचा अचानक झालेला मृत्यू हा सगळ्यांसाठीच मोठा धक्का आहे.
Powered By Sangraha 9.0