रिसोड,
farmer commits suicide तालुक्यातील धोडप बु येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष वामनराव बोडखे (वय ४६) यांनी ३ मार्च २०२६ रोजी गळफास घेऊन जीवन संपवल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात वेदना दाटून आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे वाढते कर्ज, वारंवार होणारी नापिकी, पावसाची अनियमितता आणि मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च या सर्व आर्थिक आणि मानसिक तणावाच्या ओझ्याखाली ते दबले गेले होते. शेतीवरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने प्रत्येक अपयशी हंगाम त्यांच्या मनावर खोल जखम करून जात होता. दिवसेंदिवस वाढणारा ताण, जबाबदार्यांचे ओझे आणि भविष्याची काळजी यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार असून, त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने त्या कुटुंबाचे आधारस्तंभच हरपला आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत व कुटुंबाला आधार देण्याची मागणी केली आहे.farmer commits suicide ही घटना पुन्हा एकदा शेतकर्यांच्या वेदनादायक वास्तवाकडे लक्ष वेधणारी ठरली आहे. शासनाने आणि समाजानेही अशा कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हीच आज काळाची गरज आहे.