सूरसप्तकने साजरा केला मराठी गौरव दिन

04 Mar 2026 14:28:56
नागपूर,
Marathi Pride Day मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सूरसप्तकने “मन मंदिरा” या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात ‘केस नंबर ७३’ या चित्रपटाची संवाद लेखिका व वेशभूषाकार तसेच सूरसप्तकाची गायिका डॉ. ऋचा येनुरकर भांडारकर यांचा सूरसप्तककडून सत्कार करण्यात आला.
 
Marathi Pride Day
 
‘आई भवानी’ या गीताने कार्यक्रमाची भक्तीरसयुक्त सुरुवात झाली. त्यानंतर मन मंदिरा, सख्या रे, फिटे अंधाराचे जाळे, जागेपणी, धुंद एकांत हा, हिरवा निसर्ग, कधी तू रिमझिम, जेंव्हा तुझ्या बटांना, मला वेड लागले, तळव्यावर मेंदीचा अशा ३१ मराठी एकल आणि द्वंद्व गीतांची सादरीकरणे झाली. Marathi Pride Day ही जुनी आणि नवी भावगीते, तसेच चित्रपट गीते प्रा. पद्मजा सिन्हा, प्रतिक्षा पट्टलवार, अश्विनी लुले, डॉ. ऋचा येनुरकर, संगीता भगत, अर्चना उचके, लता पटेल, अनुजा जोशी, मुकुल पांडे, डॉ. अमोल कुळकर्णी, आशिष घाटे, प्रा. निसर्ग राज, विजय देशपांडे, धीरज आटे, आदित्य फडके, योगेश देशपांडे यांनी सादर केली.
 
वाद्यसंगतीसाठी नचिकेत देव, पंकज यादव, आशिष घाटे, प्रमोद बावणे, ऋग्वेद पांडे, उल्हास चितमुलवार, तुषार विघ्ने यांनी दमदार साथ दिली. सुप्रसिद्ध निवेदिका शुभांगी रायलू यांच्या रसाळ निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. Marathi Pride Day खूप दिवसांनी फक्त मराठी गीतांच्या कार्यक्रमाने रसिकांचे मन मंत्रमुग्ध केले. यामुळे खऱ्या अर्थाने मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अरुण ओझरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0