The Kerala Story 2ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई

04 Mar 2026 10:53:00
मुंबई
The Kerala Story 2 box office collection, वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द केरळ स्टोरी २’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीला संथ गतीने वाटचाल केली असली तरी पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी त्याने बॉक्स ऑफिसवर दमदार पुनरागमन करत उल्लेखनीय कमाई नोंदवली आहे.
 

The Kerala Story 2 box office collection in holi 
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी मर्यादित थिएटर मिळाल्यामुळे चित्रपटाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. शुक्रवारी चित्रपटाने अवघी ७५ लाख रुपयांची कमाई केली. मात्र, शनिवारी परिस्थितीत बदल दिसून आला आणि चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली. दुसऱ्या दिवशी ४.६५ कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने वेग पकडला. रविवारीही हीच गती कायम ठेवत ४.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांची थिएटरकडे वाढलेली ओढ चित्रपटासाठी सकारात्मक ठरली.सोमवारी मात्र चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झाली. या दिवशी चित्रपटाने सुमारे २.५ ते २.६५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाची घोडदौड थांबेल, असा अंदाज काहींनी वर्तवला होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला. मंगळवारी पाचव्या दिवशी चित्रपटाने अंदाजे ४ कोटी रुपयांची कमाई करत सुमारे ६० ते ७० टक्क्यांची वाढ नोंदवली. या वाढीमुळे चित्रपट पुन्हा चर्चेत आला असून, वाद असूनही प्रेक्षकांचा पाठिंबा कायम असल्याचे दिसून आले आहे.
 
 
एकूण कमाईचा विचार The Kerala Story 2 box office collection,  केला असता, पाच दिवसांत भारतात चित्रपटाने सुमारे १६ ते १७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. काही व्यापार विश्लेषकांच्या मते एकूण आकडा १९ कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. सुमारे २८ ते ३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आपल्या खर्चाच्या निम्म्याहून अधिक रक्कम वसूल केली आहे. आगामी सुट्टीच्या दिवसांतही अशीच कामगिरी राहिली तर चित्रपट यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, असे संकेत मिळत आहेत.याआधी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या The Kerala Story या पहिल्या भागाने देशभरात मोठी खळबळ उडवली होती. या चित्रपटाने तब्बल ३०३.९७ कोटी रुपयांची कमाई करत ‘ऑल-टाइम ब्लॉकबस्टर’चा किताब मिळवला होता. त्या तुलनेत ‘द केरळ स्टोरी २’ अद्याप त्या उंचीवर पोहोचलेला नसला, तरी त्याची सुरुवातीची घोडदौड आशादायक मानली जात आहे.चित्रपटावरील वाद, टीका आणि समर्थन यांच्या दरम्यानही प्रेक्षकांची उत्सुकता कायम आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ‘द केरळ स्टोरी २’ची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी कशी राहते, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0