रिसोड चे पर्यटक सुखरूप मायदेशी परतले

04 Mar 2026 17:56:37
रिसोड,
us and israeli attack अमेरिका व इस्रायलने केलेल्या इराण हल्ल्यांमध्ये मध्य पूर्वेकडील भागामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे सर्व हवाई वाहतूक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. पर्यटनासाठी गेलेले अनेक भारतीय पर्यटक दुबई, कतार व अन्य देशांमध्ये अडकले होते. यामुळे भारतातील त्यांच्या कुटुंबियांना त्यांची चिंता लागली होती.
 

अटॅक  
 
रिसोड येथील निर्बान कुटुंबीय पुणे येथून वीना वर्ल्ड कंपनी मार्फत दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना दुबई येथेच अडकून रहावे लागले. विमान वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद झाल्याने ते एका हॉटेलमध्ये सुरक्षित होते. परिसरातील बॉम्ब हल्ले बघता त्यांची चिंता वाढत होती. ३ मार्च रोजी भारतीय विमान सेवा सुरू झाल्याने शहरातील पत्रकार भगवान निर्बान, पद्माबाई भगवान निर्बाण, पवन निर्बान व पद्मा पवन निर्बान हे रात्री दोन वाजता सुखरूप मायदेशी परतले. हवाई वाहतूक बंद झाल्याने आमचा परतीचा प्रवास लांबला होता.us and israeli attack युद्धजन्य परिस्थिती व माझे वय बघता माझ्यावर थोडा ताण आला होता. परंतु, भारत सरकार वर माझा पूर्ण विश्वास होता. भारत सरकारने हवाई वाहतूक सेवा सुरू करून आम्हा पर्यटकांना सुखरूप मायदेशी परत आणले त्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो असे भगवान निर्बान यांनी आमचे तालुका प्रतिनिधी जयंत वसमतकर यांना बोलताना सांगितले.
Powered By Sangraha 9.0