दोन अल्पवयीन मुलींवर वेगवेगळ्या घटनांत अत्याचार : 2 आरोपींना अटक

04 Mar 2026 21:37:55
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
abuse-of-minor-girls : तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेल्या दोन घटनांमधील दोन्ही आरोपींवर आर्णी पोलिसांनी अटक करुन पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटीसह अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
gkl
 
 
 
एका गावातील पीडित अल्पवयीन मुलगी सोमवार, 2 मार्चला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात येथे गेली असता ती एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिला केंद्रातील एका निवासात नेऊन जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
 
 
ही घटना कोणाला सांगशील तर तुला व तुझ्या घरच्यांना जिवाने मारून टाकीन अशी धमकी दिल्याच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी आरोपी राजू खुशाल राठोड (वय 28, तेंडोळी, ता. आर्णी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेचा अधिक तपास दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे करीत आहेत. त्यांना उपनिरीक्षक पल्लवी निनगुरकर, सुजित जाधव, अतुल पवार व अरविंद जाधव सहकार्य करीत आहेत.
 
 
तर दुसèया घटनेत पीडितेच्या मावशीने रविवार, 1 मार्चला आर्णी पोलिसात तक्रार केली की पिडिता घरी एकटी असताना गोलू संतोष कुडमेते (वय 23, मनपूर) याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले.
 
 
या प्रकरणी पीडितेने आर्णी पोलिसांना दिलेल्या बयानावरून आरोपीने भानसरा जंगलात शारीरिक संबध केल्यावरून आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी गोलू कुडमते याला अटक करून त्याची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास सहपोलिस निरीक्षक मिलिंद पारडकर, अतुल पवार व अरविंद जाधव करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0