वर्धा,
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून पिपरी (मेघे) येथे Sarathi Multipurpose Organization सारथी बहुउद्देशीय संस्थेद्वारे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ही संस्था २००९ पासून वर्धा जिल्ह्यात आरोग्य शिबिर घेत आहे. शिबिरात रत तपासणी, ईसीजी, मेमोग्राफी टेस्ट, मोफत डोळे तपासणी, गरजूंना चष्मे वाटप यासह विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
Sarathi Multipurpose Organization या शिबिराचा १२४८ रुग्णांनी लाभ घेतला. सारथी बहुउद्देशीय संस्थेचे अविनाश देव यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. याच शिबिरात सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा शून्य ते ५ वयोगटात घेण्यात आली. यात १०० मुलांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक गटात प्रथम पुरस्कार १५००, द्वितीय १००० आणि तृतीय पुरस्कार ५०१ रुपये देण्यात आला. आयोजनासाठी रवींद्र शेंडे, चंद्रशेखर रूईकर, चिन्मय देशपांडे, वृषाली तिवसकर, शीतल रघुशे, दामोदर चिमणे, प्राचार्य सागर झाडे, मेघा कुलकर्णी, युगा मांजरखेडे, अमिता देशपांडे आदींनी सहकार्य केले.