मुंबई
Boong movie, भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण, कारण भारतीय चित्रपट बूंग’ ला नुकताच बाफ्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ७९ व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारात ‘बूंग’ ने सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट श्रेणीत बाफ्टा जिंकून इतिहास रचला आहे. हॉलिवूडच्या ‘झूटोपिया २’, ‘लिलो अँड स्टिच’ आणि फ्रेंच ॲनिमेटेड सायन्स फिक्शन चित्रपट ‘आर्को’ यांना पराभूत करून भारतीय चित्रपटाने जागतिक पटलावर नाव कमावले आहे.
पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक लक्ष्मीप्रिया देवी, कलाकार फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर उपस्थित होते. बाफ्टा जिंकल्यानंतर लक्ष्मीप्रियाने ज्युरी सदस्यांचे आणि बाफ्टाचे आभार मानले. हा विजय भारतीय चित्रपटांसाठी आणि विशेषतः ॲनिमेशन चित्रपटांसाठी मोठी कामगिरी ठरली आहे.
‘बूंग’ चा ट्रेलर Boong movie, प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. ट्रेलरमध्ये एका अशा कुटुंबाची कथा दिसते, जिथे वडील आपल्या कुटुंबापासून दूर असतो. पत्नी त्याला घरी परत यावे अशी विनंती करते, पण काही कारणास्तव तो येऊ शकत नाही. त्यात आईला व्यथित पाहून त्यांचा लहान मुलगा वडिलांना शोधण्यासाठी प्रवासाला निघतो. ट्रेलरमध्ये या भावनिक प्रवासाची झलक दिली आहे, जिथे बालपणाची निरागसता आणि गहिरे भाव एकत्र गुंफलेले आहेत. कुटुंब, धैर्य आणि आशा यांचा संदेश या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.चित्रपट ६ मार्च रोजी भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. लक्ष्मीप्रिया देवी यांनी ‘बूंग’चे लेखन व दिग्दर्शन केले आहे. एक्सेल एंटरटेनमेंट, चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि सूटिबल पिक्चर्स यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.‘बूंग’ हा बाफ्टा जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट असल्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत या यशाचे विशेष महत्व आहे. या यशामुळे भारतीय ॲनिमेटेड चित्रपटांची जागतिक स्तरावर ओळख अधिक दृढ होणार आहे.