लाईनमन हाच महावितरणचा खरा शिलेदार : अधीक्षक अभियंता, सुरेंद्र कटके

05 Mar 2026 19:53:31
हास्य जत्रा फेम कुणाल मेश्राम यांच्या विनोदाने लाईनमनला मिळाली नवऊर्जा
 
बुलडाणा, 
Buldana Mahavitaran वीजेशिवाय जगता येत नाही, ही सत्यस्थिती आहे, परंतू ही वीज ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी महावितरणचा लाईनमन वादळ वारा , ऊन पाऊस कश्याचीही परवा न करता दिवस रात्र काम करतो. त्यामुळे जनसामान्यात लाईनमन म्हणून परिचित असलेला जनमित्र हाच महावितरणचा शिलेदार आहे, असे प्रतिपादन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी केले. विद्युत भवन बुलडाणा येथे लाईनमनच्या कामाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ४ मार्च हा राष्ट्रीय लाईनमन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हास्य जत्रा फेम कुणाल मेश्राम यांची विशेष उपस्थिती होती. तसेच कार्यकारी अभियंता मंगलसिंग चव्हाण,यांच्यासह जिल्ह्यातील जनमित्र व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

lineman 
 
Buldana Mahavitaran  सुरक्षेची शपथ घेवून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी बोलतांना अधीक्षक अभियंता म्हणाले की, आगामी काळात शंभर टक्के वीज बिलाच्या वसूलीसोबतच इंज ऑफ लिव्हींगनुसार सेवा दिली तरच महावितरणचे अस्तित्व राहणार आहे. महावितरणचे काम हे सांघिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करण्याची वेळ आली आहे आणि महावितरणचा कर्मचारी हे आव्हान स्विकारण्यास सक्षम असल्याचे ते बोलले. यावेळी कर्मचार्‍यांच्या मनोरंजनासाठी आणि तणावमुक्तीसाठी आयोजित केलेले आणि हास्य जत्रा सम्राट कुणाल मेश्राम यांच्या विनोदी सादरीकरणाने धम्माल करत २४ तास काम करणार्‍या महावितरणच्या लाईनमनला थोडा वेळ का होईन तणाव कमी करता आला, कुणाल मेश्राम यांनी विनोदासोबत सुखी आणि आनंदी जीवनाचे महत्व सांगीतले. प्रमुख उपस्थिती कुणाल मेश्राम यांच्या हस्ते उपस्थित जनमित्रांचा गौरव करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0