महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर 16 सदस्यांची नियुक्ती

05 Mar 2026 19:49:52
 काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर
 
चंद्रपूर, 
Chandrapur Municipal Corporation चंद्रपूर महानगरपालिका येथे गुरुवार, 5 मार्च रोजी पार पडलेल्या पहिल्या विशेष सभेत स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड करण्यात आली. सभागृहातील पक्षीय संख्याबळानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली. मात्र, काँग्रेस पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली. स्थायी समितीसाठी काँगे्रसच्या आ. विजय वडेट्टीवार यांच्याच गटाची नावे दिल्याने, खा. प्रतिभा धानोरकर गट संतप्त झाला.महापौर संगीता खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता मनपाच्या राणी हिराई सभागृहात महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर प्रशांत दानव, आयुक्त अकुनुरी नरेश, उपायुक्त संदीप चिद्रवार, उपायुक्त शेषराव टाले, नगरसचिव नरेंद्र बोबाटे तसेच सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. स्थायी समिती सदस्य निवडीचा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. संबंधित पक्षांच्या गटनेत्यांनी संख्याबळानुसार सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात सादर केली. त्यानंतर महापौरांनी सदस्यांची अधिकृत घोषणा केली
 
 
cg cndiwewi
 
Chandrapur Municipal Corporation  यात काँग्रेसचे 7, भाजपा-शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे 6, शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडी गटाचे 2 व महानगर आघाडी गटाच्या एका सदस्याचा समावेश आहे. नवनिर्वाचित सदस्यांचे महापौर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. स्थायी समिती सभापतीपदासाठी विभागीय आयुक्त निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. त्यानुसार पुढील काही दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
 
हे आहेत 16 स्थायी समिती सदस्य
स्थायी समिती सदस्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवक राजेश अडूर, वसंत देशमुख, चंदा वैरागड़े, संजीवनी वासेकर, सचिन कत्याल, खान साफिया तवंगर खान, विनोद लभाने या सात जणांची वर्णी लागली. तर भाजपा-शिवसेना (शिंदे गट) महायुतीतील सुभाष कासनगोट्टूवार, संजय कंचर्लावार, पुष्पा उराडे, सारिका संदुरकर, प्रज्वलंत कडू, सविता सरकार या सहा नगरसेवकांचा स्थायी समितीत समावेश झाला. शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडी गटाच्या मनस्वी गिर्‍हे, श्रुती घटे तसेच महानगर आघाडी गटाचे प्रदीप देशमुख हेही स्थायी समिती सदस्य झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0