महालक्ष्मी स्टील प्लांटच्या प्रदूषणाविरोधात देवळीत मोर्चा

05 Mar 2026 19:42:24
२० दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा
कंपनी व्यवस्थापनाला निवेदन
 
देवळी, 
Deoli: Mahalaxmi Steel Plant देवळी परिसरातील महालक्ष्मी स्टील प्लांटमधून होत असलेल्या प्रदूषणाविरोधात देवळीकरांचा संताप उफाळून आला असून युवा संघर्ष मोर्चा, देवळी व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवार ५ रोजी महालक्ष्मी स्टील कंपनीवर मोर्चा काढण्यात आला. युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शहरातून कंपनीपर्यंत हा मोर्चा काळी छत्री, काळे मास्क, काळ्या फिती लावून काढण्यात आला.
 
 
mahalakshmi
 
प्रदूषण बंद करा, देवळीकरांच्या आरोग्याशी खेळ नको, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी नागरिकांनी कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यत केला. मोर्चा कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचल्यानंतर नगराध्यक्ष किरण ठाकरे, डॉ. प्रसाद फुटाणे, डॉ. सचिन तडस यांनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणामावर मार्गदर्शन केले. कंपनीच्या पॉवर प्लांट व स्टील प्लांटमधून मोठ्या प्रमाणात फ्लाय अ‍ॅश, काळी राख तसेच कार्बन व लोखंडी धूळ हवेत पसरत असल्यामुळे शहरातील जनजीवन प्रभावित झाले आहे. प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसन, दमा व हृदयविकाराचा धोका वाढत असल्याची चिंता व्यत करण्यात आली. घरांच्या छतांवर, रस्त्यांवर तसेच सोलार पॅनेलवर राखेचा थर साचून शेतीवरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
दरम्यान, कंपनी प्रशासनाच्या वतीने एसएमडब्ल्यू Deoli: Mahalaxmi Steel Plant  स्टील प्लांटचे उपाध्यक्ष श्यामसुंदर मुंदडा, एचआर हेड दास व प्रकाश कोहळे यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी उपाध्यक्ष श्यामसुंदर मुंदडा यांनी सांगितले की, पॉवर प्लांट नुकताच सुरू करण्यात आला असून सध्या त्याचे टेस्टिंग सुरू आहे. महालक्ष्मी कंपनीमधून होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी २० दिवसांचा अवधी द्यावा. या कालावधीत आवश्यक उपाययोजना करून प्रदूषण आटोयात आणण्यात येईल. तसेच रेल्वेमार्गे येणार्‍या कोळशाच्या डम्पिंग यार्डमुळे निर्माण होणार्‍या प्रदूषणाबाबत रेल्वे बोर्डाशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
Deoli: Mahalaxmi Steel Plant  आंदोलनकर्त्यांनी २० दिवसांच्या आत प्रदूषणावर नियंत्रण आणावे, बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, शहरात रिअल-टाइम एअर वॉलिटी मॉनिटरिंग बोर्ड बसवावा तसेच प्रदूषणामुळे बाधित नागरिकांच्या उपचाराचा खर्च सीएसआर निधीतून उचलावा अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कंपनीचे कन्सेंट टू ऑपरेट रद्द करण्याची मागणी करण्यात येईल तसेच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी प्रवीण कात्रे, अशोक पवार, दादाराव मून, गौतम पोपटकर, मंगेश वानखेडे, हारून तवर, सरपंच विनोद दांडदे, मोनिका खाडे, स्वाती धांदे, शिल्पा मुरार, भारती झोरे, गौरव खोपाळ, निखिल काशीकर, दिलीप वाघमारे, सविता घुबडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0