यवतमाळ तालुक्यात विशेष महसूल शिबिरांचे आयोजन

05 Mar 2026 18:32:09
नागरिकांनी लाभ घ्यावा
तहसीलदार डॉ. देशमुख यांचे आवाहन

यवतमाळ, 
यवतमाळ तालुक्यातील नागरिकांना विविध महसुली सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या टप्पा १ अंतर्गत यवतमाळ तालुक्यात मंडळनिहाय विशेष महसूल शिबिरांचे करण्यात आले असल्याची माहिती Dr. Yogesh Deshmukh तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. या शिबिरामुळे तालुक्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम यांची बचत होऊन प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख होईल.
 
 
y ogesh
 
जिल्हाधिकारी विकास मीना तसेच यवतमाळ उपविभागीय यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबविण्यात येत आहे. शिबिरांमध्ये शेतकर्‍यांची प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, सातबारा व ८-अ उतार्‍यातील त्रुटी दुरुस्त करणे तसेच डिजिटल स्वाक्षरीयुक्त उतारे तत्काळ उपलब्ध करून देणे अशा सेवा प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांसाठी उत्पन्न, जात, रहिवासी व नॉन-कि‘मीलेयर प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार विविध दाखल्यांचे तत्काळ वितरण करण्यात येईल.
 
 
तसेच तुकडेबंदी व्यवहार मार्गदर्शन, अकृषक परवानगीबाबत माहिती ई-मोजणी अर्ज स्वीकृती, अ‍ॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी तसेच भूसंपादनासंबंधी कमी- जास्त पत्रके तयार करण्याची सुविधादेखील या शिबिरात उपलब्ध राहणार आहे. शिबिरांचे वेळापत्रक, ७ मार्च अर्जुना मंडळ, १४ मार्च लोहारा मंडळ, २४ मार्च येळाबारा मंडळ, १ कापरा मंडळ, १० एप्रिल मोहा मंडळ, १७ एप्रिल अकोलाबाजार मंडळ, २९ एप्रिल कोळंबी मंडळ, ८ मे हिवरी मंडळ, १५ मे सावरगड मंडळ, २२ मे यवतमाळ मंडळ याप्रमाणे आहे. या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी संबंधित नागरिकांनी शिबिराच्या दिनांकापूर्वी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदार Dr. Yogesh Deshmukh  डॉ. योगेश देशमुख यांनी केले.
Powered By Sangraha 9.0