रिअल इस्टेटच्या नावाखाली 1.16 काेटींची फसवणूक

05 Mar 2026 12:55:05
अनिल कांबळे
नागपूर,
fraud in real estate रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली नागपुरातील 17 व्यक्तींची सुमारे 1 काेटी 16 लाख 57 हजार 596 रुपयांनी आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत अनुसया रिअल इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांनी बाेगस ले-आऊट दाखवून ही फसवणूक केली असून, पाेलिसांनी दाेन आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

fraud 
 
 
माहितीनुसार, आराेपी सतीष महादेवराव काेल्हे (55) आणि प्रतीक अशाेकराव चाेपडे (दाेन्ही रा. वानाडाेंगरी) यांनी अनुसया रिअल इन््रास्ट्रक्चर नावाची संस्था स्थापन केली हाेती. त्यांनी िफर्यादी राजेश अजाबराव निनावे (नरेंद्रनगर) यांना माैजा काेतेवाडा, हिंगणा येथील खसरा क्रमांक 49 मध्ये चिंतामणी नगरी नावाचे मंजूर ले-आऊट असल्याचे सांगितले. आराेपींनी राजेश निनावे यांना ले-आऊटचे नकाशे दाखवून प्लाॅट नंबर 61 आणि 62 (क्षेत्रफळ 2935 चाै. ूट) 10 लाख 56 हजार 600 रुपयांत विकण्याचा करारनामा केला. निनावे यांनी आराेपींना धनादेश आणि राेख स्वरूपात एकूण 7 लाख 56 हजार रुपये दिले. अशाच प्रकारे आराेपींनी इतर 16 व्यक्तींनाही प्लाॅट दाखवून त्यांच्याकडून काेट्यवधी रुपये उकळले. पैसे घेऊनही आराेपींनी गुंतवणूकदारांना प्लाॅटचे विक्रीपत्र करून दिले नाही. गेल्या काही वर्षांपासून आराेपी टाळाटाळ करत हाेते. अखेर दाेन वर्षांपूर्वी आराेपींनी आपले कार्यालय बंद केले आणि अज्ञातस्थळी निघून गेले.fraud in real estate आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निनावे यांनी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आणि अर्जाच्या चाैकशीनंतर हिंगणा पाेलिसांनी आराेपी सतीष काेल्हे आणि प्रतीक चाेपडे या दाेघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Powered By Sangraha 9.0