वाशीम,
Hindu Sammelan पाच परिवर्तन सूत्रांच्या आधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाला आहे. आता देशातील सर्व नागरिकांनी त्यात सहभागी होऊन आपला देश विकसित, संघटित, सुरक्षित आणि आत्मगौरवाने परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सकल हिंदू समाजबांधवांनी एकजूट होऊन राष्ट्र निर्मितीच्या कार्यात रा. स्व. संघाला सहकार्य केले पाहिजे. हिंदू समाजाच्या दृष्टीने पंच परिवर्तन हा विषय अतिशय महत्वाचा असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे संघांचे विभाग बौद्धिक प्रमुख सोमेश शर्मा यांनी केले.
वाशीम नगरातील योजना पार्क आणि लगतच्या इतर वस्तीचे Hindu Sammelan विराट हिंदू संमेलन १ मार्च रोजी दत्त मंदिर योजना पार्क येथे सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळात पार पडले. कार्यक्रमाचा प्रारंभ हा कलश धारी महिला आणि वारकरी भजनी मंडळ वांगी, यांच्या सोबत वस्तीतील महिला मंडळी यांच्या शोभायात्रेनी आणि गोमाता पूजनाने झाला. त्या नंतर दिप प्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून अकोल्याचे संघांचे विभाग बौद्धिक प्रमुख सोमेश शर्मा उपस्थित होते. यावेळी संमेलन व्यासपीठावर सद्गुरू दिलीप बाबा, गोपलानाथ महाराज, शीख गुरु मां अरविंद्रजीत सिह माकीन, ज्ञानेश्वरी काळबांडे, श्रीकृष्ण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
Hindu Sammelan कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकांत राजे यांनी केले, राजेंद्र सराफ यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मुकुंद देशपांडे यांनी केले, शेवटी वंदेमातरम आणि भारत मातेच्या आरतीने संमेलनाची सांगता झाली. कार्यक्रमाला मयूर पटेल, सतीश शेवदा, अविनाश देशपांडे, प्रमोद फाटक,अरुण सरनाईक, श्यामराव उंडाळ, पद्माकर लोणसूने, जितेंद्र मेहता, सागर गायकवाड, डॉ. कैलास दागडिया, अमोल शिंदे, नगर कार्यवाह पुरषोत्तम ढोबळे, घुडे, किरण देशकर, राजाभाऊ जोशी, संजय देशपांडे, संदीप जोशी, पुरषोत्तम ढोले, वसंत कोरान्ने, श्रीपाद लक्रस, सुरेश कौडीण्य आदीसह पंरिसरातील सकल हिंदू समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.