उन्हाचा प्रचंड तडाखा; येलो अलर्ट जारी तर 'या' ठिकाणी होणार पाऊस-बर्फवृष्टीची

05 Mar 2026 12:51:05
नवी दिल्ली,
India weather forecast March मार्च महिन्याच्या सुरुवातीस देशाच्या विविध भागांमध्ये हवामानाचे बदलते स्वरूप पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज एका महत्त्वाच्या हवामान अपडेटमध्ये उत्तर भारत, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता व तापमान बदलाबाबत चेतावणी दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही प्रदेशांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही प्रदेशात दिवसातील तापमान उष्णतेसारखे राहण्याची शक्यता आहे.राजस्थानमध्ये पारा ३८ °C:मध्य प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये तापमान ३३ °C च्या वरचढलेला आहे. उत्तराखंडमध्ये 8 मार्चपासून पाऊस-बर्फवृष्टीची शक्यता दर्शवण्यात अली आहे
 

India weather forecast March 2026, North India rain alert 
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू–काश्मीरमध्ये ५ ते ९ मार्चच्या दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पर्वतीय प्रदेशांमध्ये गडद ढग, गरज-चमक आणि काही ठिकाणी बर्फाचे गोळे पडण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. हवामानातील या बदलामुळे पर्वतीय भागांमध्ये तापमानात किंचित घट जाणार आहे, तसेच थंडीचा परिणाम जाणवेल.मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशाच्या मध्य व पूर्व भागांमध्ये दिवसातील तापमान वाढीसह शुष्क हवामान राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या प्रदेशांमध्ये १० ते १२ किमी/तासापर्यंत वेगाने वारा वाहण्याची शक्यता देखील दर्शविली आहे. या भागातील नागरिकांना दिवसभरात उष्णतेचा अनुभव येऊ शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
हवामान विभागाने India weather forecast March  नागरिकांना पुढील काही दिवसांमध्ये हवामानातील बदलाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. उत्तर भारतातील काही भागात पावसाचा आणि काही भागात उष्णतेचा प्रभाव दिसत असल्याने नागरिकांनी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी योग्य तयारी करणे आवश्यक आहे. पर्वतीय प्रदेशांमध्ये बर्फ किंवा पावसाचा परिणाम राहू शकतो, तर मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या प्रदेशांमध्ये उन्हाळ्यासारखे तापमान अनुभवायला मिळेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.एकंदरीत, देशाच्या विविध भागांमध्ये हवामानाचे मिश्र स्वरूप राहणार असून, नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन खबरदारी बाळगावी, असे हवामान विभागाचे संकेत आहेत.
 
 
इशारा जारी
मुंबई आणि सभोवतालच्या India weather forecast March  शहरांमध्ये उन्हाचा जोरदार तडाखा जाणवू लागला असून तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सकाळच्या वेळीही कडाक्याचे ऊन असल्याने दादर चौपाटीसारख्या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गॉगल्स, आणि पाण्याच्या बाटल्यांसह फिरताना दिसत आहेत.गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात साधारण तीन अंशांची वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेस मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. फेब्रुवारी महिन्यात नोंदवलेल्या ३६.३ अंशांच्या तुलनेत मार्चच्या सुरुवातीला तापमानाने उच्चांक गाठला आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कमाल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकणपट्ट्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.हवामान खात्याने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे, पुरेसे पाणी पिण्याचे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे नागरिकांनी आपले आरोग्य लक्षात घेऊन वागावे, असेही हवामान खात्याने सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0