मुंबई,
Mahendra Bohra death देशभरात होळी आणि धुळवड्याचा उत्साह रंगत असताना छोट्या पडद्याचा अभिनेता करणवीर यांना वैयक्तिक दु:खाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या वडील महेंद्र बोहरा यांचे निधन झाले आहे. बोहरा हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता होते.
करणवीरने सोशल मीडियावर पोस्टद्वारे वडिलांच्या निधनाची माहिती दिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. पोस्टमध्ये त्यांनी आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत सांगितले, "माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांचे एक वेगळे स्थान होते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला साथ दिली. हिमतीने आयुष्य जगण्याचा धडा त्यांनी मला दिला."त्यांनी पुढे लिहिले की, "तुम्हाला जसा जगाचा निरोप घ्यायचा होता, तसेच पप्पा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुमची मकतरता मला कायम भासेल. ज्या लोकांचे आई-वडील या जगात नाहीत, त्यांनाच हे दु:ख समजू शकते. पण पप्पा, तुम्ही तुमचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगले. कोणालाही त्रास दिला नाही."
करणवीरने आपल्या Mahendra Bohra death वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांबद्दलही लिहिले, "तुम्ही मला तसेच दीदीला खूप काही शिकवलं. जगात कितीही संकट आले तरीही धीर सोडायचा नाही. उर्जा, सकारात्मकता घेऊन पुढे जायचं. अपयश आलं तरीही पुन्हा लढायचं, हे सगळं आम्ही तुमच्याकडून शिकलो."करणवीरच्या या भावनिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये त्यांच्यासाठी सहानुभूती आणि पाठिंबा व्यक्त केला जात आहे. महेंद्र बोहरा यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.