आकांक्षित तालुका सिरोंचात ‘संपूर्णता अभियान 2.0’चा शुभारंभ

05 Mar 2026 16:50:01
सिरोंचा, 
abhiyan 2 नीती आयोग व भारत सरकारच्या दृष्टीने सिरोंचा तालुका हा आकांक्षित तालुका म्हणून घोषित असून, 28 फेब्रवारी ते 14 एप्रिल या कालावधीत देशभरात संपूर्णता अभियान 2.0 राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत आरोग्य, पोषण, शिक्षण व पशुसंवर्धन या प्रमुख क्षेत्रांमध्ये 100 टक्के संपृक्तता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 

abhiyan  
 
 
या अभियानाच्या पृष्ठभूमीवर 28 फेब्रुवारी रोजी सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आरोग्य विभाग तसेच संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामसरपंच श्रीमती लक्ष्मी शानगोंडा यांनी भूषविले. मार्गदर्शन म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुखिराम कस्तुरे उपस्थित होते. त्यांनी संपूर्णता अभियान 2.0 च्या उद्दिष्टांची माहिती देत ग्रामपातळीवर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बालविकास अधिकारी वैशाली कोल्हे, आरोग्य सहाय्यक के. एस. रंगुवार, मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोहे, मुख्याध्यापक नीलम, पेसा समन्वयक कडूकर यांनी आरोग्य, पोषण, शिक्षण व वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत मार्गदर्शन केले.
 
कार्यक्रमास पर्यवेक्षिका एस. एस. आरवेल्लीवार, एन. व्ही. दासरी, के. एन. वेलादी, सहाय्यक शिक्षक धानगून तसेच आकांक्षित तालुका फेलो निखिल भेंडारे यांची उपस्थिती लाभली.abhiyan 2 संपूर्णता अभियान 2.0 च्या माध्यमातून सिरोंचा तालुक्यातील प्रत्येक घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवून समावेशक व शाश्‍वत विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0