नागपूरच्या पर्यटकांनी मांडली
मोठ्या हल्ल्याच्या भीतीमुळे मनात धाकधूक
नागपूरकर पर्यटक अडकले दुबईत
नामदेव भदे
नागपूर,
Nagpur tourists stranded in Dubai अमेरिका व इस्त्राईलने शनिवारी भीषण हवाई हल्ला केल्यानंतर दुबईतील एअर स्पेस बंद झाली. त्याचा फटका नागपूरच्या २२ पर्यटकांना बसला आहे. दुबई, अबुधाबी व शारजाह आदी ठिकाणी सध्या युद्धजन्य स्थितीमुळे रात्रीची झोपही उडाली आहे. नागपूरसह अनेक पर्यटकांमध्ये ’पॅनिक’ स्थिती नसली तरी सुध्दा पुढे काय होईल, याची शाश्वती नाही. इराणवरील हल्ला आणि वाढलेल्या तणावामुळे सर्वाधिक परिणाम हवाई सेवांवर झाला असून मोठ्या हल्ल्याच्या भीतीमुळे मनात धाकधूक असल्याची प्रतिक्रिया हजारीपहाड येथील रहिवासी सचिन बाळकृष्ण इंगळे व अक्षय निलम काळे यांनी व्यक्त केली आहे.
शेकडो पर्यटक हॉटेल्समध्ये अडकून
मुख्यत: आणि जन्मदिवस साजरा करण्यासाठी ८ जणांचा एक ग्रुप दुबईला २४ फेब्रुारीला आले होते. परतीचा प्रवास २८ फेब्रुारीला रात्री ११ वाजता करण्यापूर्वीच इराणवरील हल्ला आणि वाढलेल्या तणावामुळे सर्वाधिक प्रवासी विमानतळावर अडकले. उड्डाण सेवा विस्कळीत झाल्याने हजारोंच्या संख्येने भारतीय पर्यटक विविध विमानतळांवर आणि शहरांमध्ये अडकून पडले आहेत. यात नागपूरचेही शेकडो पर्यटक हॉटेल्स तर काहीजण नातेवाईकांकडे थांबले आहे.
सरकारकडून मदतीची अपेक्षा
दुबई व लगतच्या शहरातील वातावरण शांत व एकदम सामान्य असले तरी युद्धजन्य स्थितीमुळे भारतीय पर्यटकांना येथे असुरक्षित वाटत आहे. गत ६ दिवसांपासून मायदेशी परतण्यासाठी अनेक पर्यटक प्रयत्न करीत आहे. मात्र अद्याप यश मिळालेले नाही. दुबईच्या प्रशासनाचे प्रोटोकॉल पाळत सर्व पर्यटक परतण्यासाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
दैनंदिन जीवन पूर्णपणे सामान्य
Nagpur tourists stranded in Dubai विशेषतः दुबईमध्ये स्थिती चिंताजनक असताना सरकारी कार्यालये व व्यावसायिक प्रतिष्ठानेही सुरू आहेत. स्थानिक नागरिक बिनधास्तपणे बाहेर फिरत आहेत. मात्र भारतीय पर्यटकांच्या मनात युध्दाची भीती वाढली आहे. शहरातील दैनंदिन जीवन पूर्णपणे सामान्य असताना एखाद्या हवाई हल्ला झाल्यास मोठे नुकसान शक्यता आहे. त्यामुळे येथून मायदेशी परतण्यासाठी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पर्यटकांमध्ये अक्षरशः होड लागली आहे. अनेक पर्यटकांना दुबईच्या विमानतळावर प्रवेश नसल्याने हॉटेल्समध्ये राहण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याची माहिती अक्षय काळे यांनी दिली.
उड्डाणाद्वारे काही नागरिक मायदेशी परतणार
नागपूर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर नागपूरमधील २२ जणांनी मदतीसाठी संपर्क साधला असून सर्व पर्यटक दुबई, अबुधाबी, बहरीन, शारजहा आदी शहरातील हॉटेल्समध्ये थांबले असल्याची माहिती जिल्हा व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी दिली आहे. सर्व पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. येत्या ८ मार्च रोजी विशेष उड्डाणाद्वारे काही नागरिक मायदेशी परतणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.