कृष्णा हरलेंची कविता म्हणजे समग्र परिवर्तनाचा निनाद : वरकड

05 Mar 2026 18:11:56
आदर्श होळी कार्यक्रमात ‘निनाद’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
 
वर्धा, 
साहूर येथील कवी कृष्णा हरले साहुरकरांची कविता ग्रामीण लोकजिवनापासून सर्वस्तरावरचे प्रतिनिधित्व करणारी, समग्र परिवर्तनाचा ‘Ninaad’ poetry collection ‘निनाद’ करणारी कविता आहे. त्यांच्या कवितेतून ग्रामीण जीवन, सर्वसामान्यांचे दु:ख, आशा, अपेक्षा व्यत होतात, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांनी केले.
 
 
prakation
 
साहुर येथील विदर्भगौरव पुरस्कार प्राप्त युवाकवी कृष्णा हरले साहुरकर यांच्या ‘निनाद’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन लक्ष्मीनारायण मंदिर सभागृह, साहुर येथे वरकड यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अ. भा. गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. दिलीप कोहळे, पंस माजी सदस्य ईश्वर वरकड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर तथा संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ नामकरण आंदोलन समितीचे मुख्य प्रवर्तक रमेशचंद्र सरोदे, उत्तम करांगळे, सरपंच प्रकाश गायकवाड, सावंगा पुनर्वसनचे सरपंच विनोद सोनोने, बेलगावचे सरपंच स्वप्नील खवशी आदी उपस्थित होते.
 
 
कृष्णा हरले साहुरकर यांच्या ‘Ninaad’ poetry collection  ‘निनाद’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अहल्यानगर येथील काव्यगंध प्रकाशन या प्रकाशन संस्थेद्वारे करण्यात आले आहे. होळीच्या मुहुर्तावर आदर्श होळी धूलिवंदनाच्या अभिनव कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अ. भा. गुरुदेव आश्रम गुरुकुंज मोझरीचे जिल्हा सेवाधिकारी प्रभाकर गायकवाड, अ‍ॅड. अश्विनी कोहळे, गजानन सरोदे, प्रशांत काकपुरे, बोरगाव येथील आदर्श शेतकरी मोहन राठी, आर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश अहिव या मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्तविक रमेशचंद्र सरोदे यांनी केले. निनाद काव्यसंग्रहामागची भूमिका कवी कृष्णा हरले साहुरकर यांनी मांडली. संचालन गायत्री घोटकर व कल्याणी खिरटकर यांनी केले तर आभार दीपक खरडे यांनी मानले. कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0