नागपूर,
Patanjali Yoga Committee ज्येष्ठ नागरिक मंडळ रघुजी नगर व पतंजली योग समिती तर्फे होळी मिलन कार्यक्रम जवाहर सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ योग शिक्षक नामदेव फटिंग होते. मंडळाच्या सहसचिव वंदना तांदूळकर यांनी योगशिक्षक नामदेव फटिंग, पद्माकर आगरकर, मोरेश्वर मेघरे आणि अतिथी महादेव बोराडे यांना टोपी घालून, गुलाल लावून व गाठीचा हार घालून सत्कार केला.
हरीश देशमुख आणि महादेव बोराडे यांनी होळीचे महत्त्व सांगितले. फटिंग यांनी सांगितले की होळीच्या अग्नीमध्ये आपल्या वाईट सवयी, क्रोध, इर्षा सारख्या नकारात्मक भावनांना जाळून टाकणे आवश्यक आहे.Patanjali Yoga Committee सर्वांनी एकमेकांना गुलाल लावून शुभेच्छा दिल्या.वाल्मीक आंबेकर यांनी प्रास्ताविक, तर श्रीराम दुरगकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद गुंटेवार, पद्माकर बाविस्कर, विद्या सातपैसे, दादाराव दातारकर यांनी श्रम केले.
सौजन्य:श्रीराम दुरूगकर,संपर्क मित्र