आनंदाची बातमी! 2500 तरुणांना मिळणार रोजगार... पहा कुठे?

05 Mar 2026 12:10:42
पुणे,
Pimlapada-Sawale Udchan Hydroelectric Project, महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देणारा आणि हजारो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा प्रकल्प पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १०,२१७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी झाली असून, या प्रकल्पामुळे अंदाजे २,५०० थेट रोजगार निर्माण होणार आहेत.
 

Pimlapada-Sawale Udchan Hydroelectric Project, EDF Solution Private Limited, Maharashtra power project, 
चॅम्बेरी पॉवर (ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड) यांच्या माध्यमातून 'पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प' सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारला जाणार असून, त्याची क्षमता २,१०० मेगावॉट इतकी असेल. या प्रकल्पामुळे राज्यातील वीजपुरवठा केवळ स्थिर होणार नाही, तर स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.सुमारे १०,२१७ कोटी रुपयांची Pimlapada-Sawale Udchan Hydroelectric Project,  गुंतवणूक असलेला हा प्रकल्प पुणे आणि रायगड जिल्ह्यांतील दुर्गम भागांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा ठरेल. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारातून स्थानिक तरुणांना काम मिळणार असून, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा निर्मितीमुळे राज्याच्या तिजोरीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल वाढणार आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला मोठा वेग मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.सध्या महाराष्ट्रात अशा ५५ जलविद्युत प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे, ज्यातून एकूण ७८,२१५ मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे. संपूर्ण राज्यात या माध्यमातून सुमारे ४.१७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १.२८ लाख लोकांसाठी रोजगारनिर्मितीची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऊर्जा क्षेत्रातील या मोठ्या गुंतवणुकीमुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल, असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0