राज्यसभा निवडणुकीत स्पर्धा नाही...सात जागांसाठी सातच अर्ज!

05 Mar 2026 15:37:15
मुंबई,
Rajya Sabha Elections Maharashtra राज्यसभेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पूर्वी दोन उमेदवार देण्याची चर्चा असलेली शिंदे गटाची शिवसेना अखेर एकच उमेदवार देऊन निवडणुकीत आपली बाजू स्पष्ट केली आहे. ज्योती वाघमारे यांनी आपला अर्ज दाखल केला, तर रोहित टिळक यांच्या उमेदवारी अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. परिणामी, राज्यातील सात जागांसाठी एकूण सात अर्ज दाखल झाले असून ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
 
 

Rajya Sabha  
राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून चार उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून एक अर्ज दाखल झाला आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचा अर्ज दाखल असून निवडणूक आता बिनविरोध ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाजवळ अतिरिक्त २० मते असल्याने आणि राष्ट्रवादीकडे अतिरिक्त तीन मते असल्याने दुसरा उमेदवार देऊन शरद पवारांसमोर आव्हान निर्माण होऊ शकले असते. रोहित टिळक यांच्या उमेदवारीसुद्धा चर्चा झाली होती, पण शेवटच्या क्षणी दुसरा उमेदवार देण्यात आला नाही आणि निवडणूक बिनविरोध ठरली.
 
 
 
दरम्यान, शरद पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत, तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांनीही दोन अर्ज भरण्यात आले. त्यामुळे एखादा अर्ज नाकारला गेला तरी दुसरा कायम राहील.निवडणूक प्रक्रियेत शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती. विशेष बाब म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन सर्व प्रक्रिया पूर्ण केली. ही राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या संदर्भातील पहिलीच अशी घटना ठरली आहे की आजारी व्यक्ती उपस्थित राहता आले नाहीत.
Powered By Sangraha 9.0