रिसोड - मेहकर मार्गावरील पावर हाउस परिसरात आग

05 Mar 2026 18:04:40
झाडे-झुडपे जळून खाक
रिसोड, 
Risod - Mehkar: Fire in the power house area रिसोड - मेहकर मार्गावरील पावर हाउस परिसरात गुरुवार, ५ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत परिसरातील झाडे व झुडपे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. या आगिमध्ये कोणत्या प्रकारची जीवित हानी झाली नसून मात्र एक मोठे नुकसान होता होता टळले असल्याचे या घटनेतून दिसून आले.
 
 
powerf house
 
आगीची माहिती रिसोड नगर परिषद अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न केले. यादरम्यान नागरिकांनीही आग विझवण्याचे प्रयत्न केले. आगीचे लोन ३० ते ४० फूट पर्यंत उंच उठत असल्याचे दिसून आले. आगीची तीव्रता वाढल्यामुळे पावर हाउस परिसरातील सर्वच झाडेझुडपे गवत जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग आटोयात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही काळ पावर हाऊस परिसरा लागून असलेल्या महात्मा फुले नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 
 
Risod - Mehkar: Fire in the power house area  आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीची तीव्रता बघता पावर हाऊस ला लागून असलेल्या शेतकर्‍यांच्या मनात धडकी भरली होती. शेतकर्‍यांनी आग आपल्या शेतापर्यंत येऊ नये यासाठी उपाययोजना सुद्धा सुरू केल्या होत्या. मात्र आग ही पावर हाऊस परिसरातील वॉल कंपाऊंड च्या बाहेर आली नसल्याने शेतकर्‍यांचे एक मोठे नुकसान यावेळी टळले असल्याने शेतकर्‍यांनी सुद्धा सुटकेचा निष्वास घेतला.
Powered By Sangraha 9.0