जिल्हा न्यायालयात बाॅम्बस्फोटाची अफवा

05 Mar 2026 11:27:05
अनिल कांबळे
नागपूर,
bomb blast जिल्हा न्यायालयात बुधवारी दुपारी बाॅम्बस्फोट हाेणार आहे, असा धमकीचा ईमेल न्यायालय प्रशासनाला प्राप्त झाला. न्यायालयाने पाेलिसांना माहिती दिली. त्यामुळे पाेलिसांमध्ये एकच खळबळ उडाली तर वकिलांची चांगलीच धावपळ झाली. शेवटी बीडीडीएसच्या टीमने संपूर्ण न्यायालय परीसर पिंजून काढल्यानंतर ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिस आणि वकिलांनी सुटकेचा निःश्वास साेडला.
 

स्फोट  
 
 
जिल्हा न्यायालय प्रशासनाच्या ईमेलवर एका अज्ञात व्यक्तीचा ईमेल आला. त्यात सायनाईट बाम्बचा स्ाेट घडवून आणण्यात येणार आहे, अशी धमकी हाेती. त्यामुळे जिल्हा न्यायालय प्रशासनाने सदर पाेलिसांना ाेन करुन माहिती दिली. सदरचे ठाणेदार अमाेल देशमुख हे ताफफ्यासह न्यायालयात पाेहचले. त्यांनी लगेच बीडीडीएस पथकाला माहिती दिली. पाेलिसांनी तात्काळ न्यायालय परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली. वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचारी यांना सूचना देऊन सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितले. काही काळासाठी न्यायालयीन कामकाज थांबविण्यात आले हाेते. परिसरात माेठ्या प्रमाणात पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला. शहर पाेलिस तसेच बाॅम्ब शाेधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाच्या मदतीने न्यायालयातील सर्व परीसर, वाहनतळ आणि आसपासचा परिसर तपासण्यात आला. सुमारे दाेन तासांच्या तपासणीनंतर काेणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.bomb blast त्यामुळे ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. पाेलिसांनी अफवा पसरविणाèया अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
.........
Powered By Sangraha 9.0