साक्षी देवकर हिच्या विज्ञान प्रतिकृती ची ‘इन्स्पायर अवॉर्ड -मानक’ योजनेसाठी निवड

05 Mar 2026 17:58:53
वाशीम, 
श्री बाकलीवाल विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी साक्षी किशोर देवकर हिची विज्ञान प्रतिकृती Sakshi Deokar: ‘Inspire Award - Standard’ ‘इन्स्पायर अवॉर्ड —मानक’ योजनेसाठी निवड झाली आहे. तिच्या नाविन्यपूर्ण विज्ञान प्रतिकृतीसाठी केंद्र सरकारकडून प्रतिकृती तयार करण्यासाठी १० हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे.
 
 
Sakshi
 
Sakshi Deokar: ‘Inspire Award - Standard’  इन्स्पायर अवॉर्ड —मानक’ ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे इयत्ता ६ वी ते १० वी (वयोगट १० ते १५ वर्षे) मधील विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, नाविन्यपूर्ण विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यास प्रोत्साहन दिले जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन पद्धतीने नोंदवली जातात. सादर केलेली विज्ञान प्रतिकृती नाविन्यपूर्ण व उपयुक्त असल्यास ती विकसित करण्यासाठी शासनाकडून १० हजार रुपयाची ची आर्थिक मदत दिली जाते. साक्षी देवकर हिचे संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड सुरेंद्रकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक बबन बिल्लारी, उपमुख्याध्यापक सुनील दंभीवाल यांनी अभिनंदन केले आहे तसेच विज्ञान शिक्षक शैलेश वाडेकर, अपर्णा बोलवार, विजय कोरान्ने, नितीन गाभणे, राजकुमार आहाळे, आशिष विभुते यांनी मार्गदर्शन केले.
Powered By Sangraha 9.0