येत्या सत्रापासून प्राथमिक शाळांमध्ये नर्सरीचे वर्ग !

05 Mar 2026 19:25:15
पालिकेचा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर
 
सिंदी (रेल्वे), 
Sindhi (Railways), Municipal Councils शहरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सर्वसमावेशक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नवीन शैक्षणिक सत्रापासून शहरातील प्राथमिक शाळांमध्ये नर्सरी वर्ग सुरू करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला नगराध्यक्ष राणी कलोडे, उपाध्यक्ष अकील शेख, मुख्याधिकारी पौर्णिमा गावित तसेच सर्व पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते.
 
 
sindi
 
Sindhi (Railways), Municipal Councils  बैठकीत प्राथमिक शिक्षणाचा पाया भकम करण्यासाठी लहान वयोगटातील मुलांसाठी नर्सरी वर्गाची आवश्यकता अधोरेखित करण्यात यावी. तसेच शहरातील वाढती लोकसंख्या आणि पालकांची मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण सभापती राजश्री बोरीकर यांनी स्पष्ट केले. नवीन सत्रापासून नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून नर्सरी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूदही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या निर्णयामुळे लहान मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार असून पालकांची आर्थिक व वेळेची बचत होणार आहे. नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
Powered By Sangraha 9.0