नागपूर,
Somalwada Surendranagar सोमलवाडा भागातील सुरेंद्रनगर वस्ती येथे हिंदू संमेलन आयोजन समितीच्या वतीने सकल हिंदू समाज संमेलन राधाकृष्ण मंदिर, नासा ग्राउंड येथे उत्साहात संपन्न झाले.संमेलनाच्या निमित्ताने २६ फेब्रुवारीपासून चार दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महिलांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धा, तर मुला-मुलींसाठी क्रीडा व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांचे नियोजन व आयोजन सविता जोशी, राधिका जलताडे,. अंजली बर्डे, . धनश्री देव, . संगीता गायकवाड व . चंद्रकांत मगरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. स्पर्धांना महिला व मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१ मार्च रोजी सायंकाळी स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत तरुण-तरुणी, महिला, पुरुष व मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध वस्त्यांमधून रॅली जात असताना नागरिकांनी रस्ते रांगोळ्यांनी सजवून आणि फुलांच्या वर्षावाने स्वागत केले. Somalwada Surendranagar सायंकाळी सहा वाजता मुख्य कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुल रामटेक येथील विद्यार्थ्यांच्या स्वस्तीवाचनाने झाली. यावेळी अध्यक्ष डॉ. अश्विन चुटे, प्रमुख वक्ते प्रा. विजयराव राठोड, नीलाताई भिडे, स्वामी ज्ञानदानंद पद्मश्री डॉ. विलासजी डांगरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गोपूजन करण्यात आले.प्रास्ताविकात . नीला भिडे यांनी हिंदू समाजाला एकत्र जोडण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. स्वामी ज्ञानदानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज + जिजाबाई यांचा आदर्श समोर ठेवून समाजाने एकात्मता, संघटन आणि निडरता जपण्याचा संदेश दिला.यानंतर मनस्वी संस्थेच्या माध्यमातून शिवगो ग्रुपमधील किन्नर मुलींनी वंदे मातरम् गीतावर नृत्य सादर केले. तसेच दंतेश्वरी वस्तीतील संस्कार केंद्रातील मुलींनी रामभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमात पद्मश्री डॉ. विलासजी डांगरे यांचा मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन आदित्य देशकर यांनी केले.
सौजन्य:आसावरी कोठीवान,संपर्क मित्र