सुनेत्रा पवार कुटुंबासह पंतप्रधानांची भेट घेणार!

05 Mar 2026 17:05:11
पुणे,
Sunetra Pawar will meet the PM अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार सातत्याने या घटनेला अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. त्यांनी याप्रकरणी तीन पत्रकार परिषदांचे आयोजन केले असून गंभीर आरोप आणि दावे मांडले आहेत. रोहित पवारांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.सध्या या प्रकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी प्रत्यक्ष भाष्य केलेले नाही, तरी त्यांच्या मनातही संशय निर्माण झाल्याचे दिसते. यामुळे अजित पवारांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
Sunetra Pawar
 
कुटुंबीयांचा असा विश्वास आहे की अजित पवारांचा अपघात घातपात असण्याची शक्यता आहे. ते विमान अपघात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित कंपनीची सर्व विमानं तात्काळ जमिनीवर आणली जावीत अशी मागणी करत आहेत.रोहित पवारांनी आधीच राज ठाकरेंना एफआयआर नोंदवण्यास अडथळा निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी म्हटले की, “मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनला अधिकारी एफआयआर टाइप करत होते. तिथे डीसीपी आले आणि एफआयआर घेऊ नका सांगितले. जर काही घातपात नसेल, तरी घरच्या लोकांच्या शंकेला सरकारकडून अडथळा का?
 
या प्रकरणात जय पवारांनी VSR कंपनीच्या मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडिओ समोर आणला आहे. यात रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले दिसत आहेत. या निष्काळजीपणामुळे VSR कंपनीवर लक्ष ठेवण्यात आले असून, जय पवारांनी रोहित सिंह यांना अटक करण्याची मागणी केली आहे.पूर्वीही रोहित पवारांनी DGCA अहवाल आणि प्रेझेंटेशनमध्ये VSR कंपनीच्या अनागोंदी कारभारावर बोट ठेवले होते, आता त्याच कंपनीच्या मालकाच्या निष्काळजीपणाचा व्हिडिओ समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर ठरले आहे.
 
 
रोहित पवार म्हणाले आहेत की, माझ्या दादांच्या विमान अपघाताचा जबाबदार कोण असेल, त्यांना आम्ही कदापि सोडणार नाही. सध्या DGCA कडून यावर कारवाई होईल की नाही, याबाबतही कुटुंबीय शंकित आहेत.या सर्व घडामोडींमुळे अजित पवारांच्या कुटुंबीयांमध्ये चिंता वाढली असून त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ठामपणे ठेवली आहे.
Powered By Sangraha 9.0