रुग्णवाहिका परत बोलवल्याने झाला राडा; महिलेचा मृत्यू

05 Mar 2026 18:15:22
 तळेगावात अर्ध्या रात्री डॉटरला मारहाण
 
तळेगाव (श्या.पंत),
नजिकच्या चिस्तुर येथील महिला गंभीर आजारी असल्याने तिला Talegaon ambulance case तळेगाव येथील १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने वर्धा येथील रुग्णालयात नेण्यात येत असताना तळेगाव येथील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यानी ती रुग्णवाहिका आर्वी येथून परत बोलवली. आर्वी येथून खाजगी रुग्णवाहिकेने महिलेला वर्धा येथे नेण्यात आले. परंतु, त्या महिलेला मृत्यू झाला. या प्रकरणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्ध्यारात्री गावकर्‍यांनी राडा केला. यात डॉटरला चांगलाच चोप देण्यात आल्याने डॉटरही जखमी झाले. ही घटना बुधवार ४ रोजी घडली.
 
 
dksldksld
 
चिस्तुर येथील लता मिसळे (४५) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संकेत रावेकर यांना फोन करून रुग्णवाहिका मागविली. मात्र, डॉ. रावेकर यांनी रुग्णवाहिका केवळ गरोदर मातांसाठी असल्याचे सांगितले. त्यावेळी रुग्णाला आर्वी पर्यंत नेणार असून पुढे दुसरी रुग्णवाहिका बोलावू, असे सांगण्यात आले. त्यामुळे डॉ. रावेकर यांनी चिस्तुर येथे रुग्णवाहिका पाठविली. रुग्णाला आर्वी येथे नेल्यानंतर रुग्णवाहिका परत आली. आर्वी येथे उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह चिस्तुर येथे आणत असताना महिलेच्या नातेवाईकांनी तसेच काही अन्य लोकांनी तळेगाव आरोग्य केंद्रात वाहन लावून महिलेच्या मृत्यूला डॉ. रावेकर यांना जबाबदार धरून सात ते आठ लोकांनी त्यांना जबर मारहाण केली. यात ते जखमीही झाले. याप्रकरणाची तक्रार तळेगाव पोलिस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
 
 
दोघांचीही चूक : डॉ. बेले
Talegaon ambulance case  या घटने संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल बेले यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, जो प्रकार घडला तो अपेक्षित नाही. १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका घरून रुग्ण नेण्यासाठी देण्यात येत नाही. वैद्यकीय अधिकार्‍याने ती दिली. मात्र, आर्वी येथुन त्याच अधिकार्‍याच्या आदेशाने चालकाने ती रुग्णवाहिका तळेगाव येथे परत आणली. त्यातूनच हा प्रकार घडला. रुग्णाच्या नातेवाईकांना आर्वी येथे रुग्ण तपासणी करण्याचे सांगितले. परंतु, त्यांनी वर्धा येथेच रुग्ण तपासणी करण्याचा हट्ट धरला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांनीही रुग्णवाहिका परत बोलवायला नको होती, असे त्यांनी तरुण भारतसोबत बोलताना सांगितले.
 
 
आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करा
Talegaon ambulance case  दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ तालुकास्तरीय वैद्यकीय संघटनेच्या वतीने तळेगावचे पोलिस निरीक्षक मंगेश भोयर यांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर घटनेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैद्यकीय अधिकारी श्रद्धा घुमारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करणे आणि सुरक्षेसंबंधी समस्या निकाली निघेपर्यंत कामावर रुजू होणार नाही, अशी भूमिका घेतली. सरकारी डॉटरांवर वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे आरोग्य यंत्रणेवर दबाव वाढत असून डॉटरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे
Powered By Sangraha 9.0