मानोरा,
तालुयातील सहा मंडळांमध्ये आयोजित करण्यात येणार्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानातून जनतेचे प्रलंबीत कामे निकाल निघणार लावली जाणार असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन Tehsildar Rajendra Patil तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी केले. तहसील कार्यालयात ५ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Tehsildar Rajendra Patil यावेळी त्यांनी सांगितले की महसूल विभागाशी संबंधित सुमारे १५ प्रकारची प्रलंबित कामे या शिबिरांमध्ये तात्काळ मार्गी लावली जाणार आहेत. यामध्ये सातबारा उतारा, फेरफार दुरुस्ती, विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.तसेच भूसंपादनाशी संबंधित प्रकरणे, शासनाच्या विविध योजना, कृषी, आरोग्य व बचत गट योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीही या शिबिरांचा उपयोग होणार आहे. या अभियानात खासदार, आमदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच स्थानिक मान्यवरांचा सहभाग वाढवून महसूल विभागाचे काम अधिक गतिमान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे समाधान शिबिर ७ मार्च ते १५ मे या कालावधीत तालुयातील सहा मंडळांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उमेश राठोड तसेच निवासी नायब तहसीलदार मधुकर अस्टुरे उपस्थित होते.