अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकर्‍यांनी केवायसी करून घ्यावी : तहसीलदार महाले

05 Mar 2026 18:02:11
कारंजा लाड, 
तालुयात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना केवायसी अपूर्ण राहिल्यामुळे ज्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी तात्काळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन Tehsildar Ravi Mahale तहसीलदार रवि महाले यांनी केले आहे. संबंधित शेतकर्‍यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडून व्हीके नंबर घ्यावा. त्यानंतर ग्राहक सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक थंब देऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
 
 
Ravi
 
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.याशिवाय, भविष्यातील सर्व प्रकारचे अनुदान व शासकीय योजनांची अंमलबजावणी डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकर्‍यांनी आपला फार्मर आयडी तात्काळ काढून घ्यावा, जेणेकरून पात्रतेनुसार विविध शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळू शकेल तसेच अनुदान प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांनी विलंब न करता आवश्यक केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन Tehsildar Ravi Mahale  तहसीलदार रवि महाले यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0