‘जना नायगन’च्या प्रदर्शनावरून वाद

05 Mar 2026 10:56:19
मुंबई,
Thalapathy Vijay, तामिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता Thalapathy Vijay थलापती विजय याचा अभिनयातून निवृत्तीपूर्वीचा शेवटचा चित्रपट ‘जना नायगन’ सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्याच्या प्रदर्शनाबाबत अनिश्चितता कायम आहे. सेन्सॉर प्रक्रियेत निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणींमुळे या चित्रपटाची रिलीज तारीख वारंवार पुढे ढकलली जात आहे. सुरुवातीला हा चित्रपट ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता; मात्र अद्यापही त्याला प्रमाणपत्र न मिळाल्याने चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत.
 

Thalapathy Vijay, Jana Nayagan movie, Jana Nayagan release date 
या पार्श्वभूमीवर विजयने Thalapathy Vijay, पहिल्यांदाच या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली. बुधवारी, ४ मार्च रोजी तामिळनाडूमधील Thanjavur येथे राजकीय मोहिमेचा भाग म्हणून आयोजित समर्थकांच्या मेळाव्यात त्याने या विषयावर भाष्य केले. विजय केवळ अभिनेता नसून तो राजकारणातही सक्रिय झाला असून त्याच्या पक्षाच्या प्रचारासाठी तो राज्यभर दौरे करत आहे.मेळाव्यात बोलताना विजय म्हणाला की, “पुढचे सरकार टीव्हीकेचे असेल. मच्छिमार बांधवांनी आशा सोडू नये, त्यांचे सर्व प्रकारे संरक्षण केले जाईल. ‘जना नायगन’च्या प्रदर्शनाच्या वेळी अनेकांनी मला पाठिंबा दिला. मुख्यमंत्र्यांनीही समर्थन दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री मला गप्प करू शकतात, परंतु प्रत्येक घरात असलेल्या विजयला गप्प करू शकत नाहीत.” विजयच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
 
दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री M. K. Stalin यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये केंद्रीय संस्थांवर अप्रत्यक्ष टीका करत म्हटले की, “ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाप्रमाणेच Central Board of Film Certification देखील केंद्र सरकारच्या हातातील कठपुतळी बनले आहे. त्याचा वापर केला जात आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे चित्रपटाच्या वादाला राजकीय रंग मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.‘जना नायगन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप स्पष्ट तारीख जाहीर झालेली नाही. कॅनडातील वितरक यॉर्क सिनेमा यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट एप्रिल २०२६ पूर्वी प्रदर्शित होण्याची शक्यता नाही. १४ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात ३० एप्रिलपूर्वी चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच ज्यांना तिकीटांचे परतावे मिळालेले नाहीत त्यांनी संबंधित चित्रपटगृहांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
 
 
दरम्यान, निर्मात्यांनी Thalapathy Vijay, सेन्सॉर बोर्डाविरुद्ध दाखल केलेला खटला Madras High Court मधून मागे घेतला असला तरी चित्रपटाला अद्याप अधिकृत प्रमाणपत्र मिळालेले नाही. या प्रक्रियेमुळेच चित्रपटाच्या प्रदर्शनात आणखी विलंब होत असल्याचे समोर आले आहे.या वादाची सुरुवात डिसेंबर २०२५ मध्ये झाली. निर्मात्यांनी चित्रपट प्रमाणपत्रासाठी सेन्सॉर बोर्डाकडे सादर केला असता बोर्डाने १६ कट आणि काही बदल सुचवले. निर्मात्यांनी ते बदल करून चित्रपट पुन्हा सादर केला; मात्र काही दृश्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगत बोर्डाने प्रमाणपत्र रोखून ठेवले. परिणामी हे प्रकरण न्यायालयातही गेले.याचदरम्यान तामिळनाडूमध्ये मार्च ते एप्रिलदरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विजय आपल्या पक्षासोबत निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर राजकीय परिस्थितीचा देखील परिणाम होऊ शकतो, असे चित्रपटसृष्टीत बोलले जात आहे. त्यामुळे ‘जना नायगन’ नेमका कधी प्रदर्शित होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0