केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दुबईत अडकलेल्या कुटुंबीयांना पोचवले सुखरूप घरी

05 Mar 2026 20:01:02
बुलडाणा, 
US-Iran War अमेरिका आणि इराकच्या युद्धामुळे जगातील परिस्थिती सध्या अतिशय तणावपूर्ण झाली आहे. या परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये विमानसेवा विस्कळीत झाली आहे. त्याचे पडसाद दुबईसह अनेक ठिकाणी दिसत आहेत.अकोला येथील माजी जेष्ठ नगरसेवक गोपीभाऊ ठाकरे यांचे जावई तुषार घोराडकर, मुलगी सायली आणि पुजा ठाकरे आणि सात वर्षाचा नातू अहान हे युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकून पडले होते. भारतात परत जाण्यासाठी कोणताच मार्ग दिसत नव्हता. यातून कधी बाहेर पडू याची कोणतीही शाश्वती त्यांना दिसत नव्हती.
 

us iran 
 
दि. ४ मार्चला दुपारी गोपीभाऊंचा फोन अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार उमेश अलोने यांना आला. नेहमी करारी आणि बिनधास्त वाटणार्‍या त्या आवाजात त्या दिवशी अस्वस्थता आणि काळजी स्पष्ट जाणवत होती. विमानसेवा बंद असल्यामुळे पुढील दहा-बारा दिवस त्यांची सुटका होण्याची कोणतीही शयता नव्हती. त्या क्षणी त्यांनी राज्य कामगार विमा योजना विभागाचे संचालक सोहम वायाळ यांच्या माध्यमातून संपर्क साधला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या टीमने परराष्ट्र मंत्रालय आणि US-Iran War  दुबईतील भारतीय दूतावासाशी तातडीने संपर्क साधून अवघ्या दोन तासांत त्यांची तिकिटं मिळवून दिली. व रात्री ते भारतासाठी रवाना झाले आणि आज दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईत सुखरूप पोहोचले.
Powered By Sangraha 9.0