तभा वृत्तसेवा
मारेगाव,
pratibha-dhanorkar : मारेगाव तालुक्यातील प्रशासकीय विभागाची आढावा बैठक खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेत गुरुवार, 5 मार्चला मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये पार पडली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाच्या विविध विभागातील समस्यांचा पाढा खासदारांसमोर मांडला. मात्र यामध्ये बèयाच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण विविध विभागातील अधिकèयांना करता न आल्याने उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
या प्रशासकीय विभागाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्ष खा. प्रतिभा धानोरकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, माजी जिल्हा परिषद सभापती अरुणा खंडाळकर, बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराना, तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी भीमराव व्हणखंडे, मारेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष वसंत आसुटकर मंचावर उपस्थित होते.
सभागृहात उपस्थित नागरिकांनी विविध विभागातील नागरिकांच्या समस्या समोर मांडल्या यावेळी महसूल, पंचायत समिती, भूमी अभिलेख, पोलिस विभाग, महावितरण, जिल्हा परिषद बांधकाम, वनविभाग अशा संबंधित विभागांच्या कर्मचाèयांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
परंतु बèयाच नागरिकांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नाराजी दिसून आली. विशेषत: महसूल विभागाचे पांदण रस्ता, वहिवाटीचे रस्ते, रेतीची समस्या, पंचायत समितीचे घरकुल हप्ते न मिळणे, ग्रामपंचायत स्तरावरील समस्या, याबाबत झालेले खुलासे असमाधानकारक होते.
त्याचबरोबर नागरिकांनी तालुक्यातील अवैध व्यवसाय, दारू, मटका याबाबत आणि मारेगावच्या मारहाण प्रकरणात तपास अधिकारी बारेकर तपासात हयगय करीत असल्याचा आरोप करीत सुनंदा भेले यांनी पोलिस प्रशासनाला घेरले. तसेच तालुक्यात वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली. भूमी अभिलेख कार्यालयातील सावळागोंधळ नागरिकांनी यावेळी कथन केला.