घर बांधकामाच्या वादातून मारहाण

06 Mar 2026 19:56:59
मालेगाव, 
beating-due-to-argument : तालुयातील शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील पेनबोरी गावात घर बांधकामाच्या कारणावरून झालेल्या वादात एका महिलेस मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
jkl
 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेनबोरी येथील मंगल दशरथ फुके वय ५० यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवार ५ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास शेजारी भगवान बोरकर यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. बांधकामादरम्यान आधी ठरलेल्या सामाईक भिंतीवरून वाद निर्माण झाला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार बोरकर कुटुंबीयांनी सामाईक भिंत त्याच जागेवर बांधण्याचे सांगितले होते, मात्र नंतर त्यांनी कथितरित्या त्यांच्या जागेकडे कॉलम टाकून स्लॅबचे काम सुरू केले.
 
 
यास विरोध केल्यावर आरोपी अंकुश बोरकर, बालू बोरकर, उद्धव बोरकर, लक्ष्मण बोरकर आणि भगवान बोरकर सर्व राहणार पेनबोरी, तालुका रिसोड यांनी शिवीगाळ करत तक्रारदार महिलेला पकडून खाली पाडले. तिचे केस धरून ओढूले व दगड तसेच हात बुयांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांनाही धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0