अ.भा. प्रेरणा उत्सवासाठी वाशीमच्या दिशा जोगदंडची निवड

06 Mar 2026 19:59:16
वाशीम, 
disha-jogdand : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित प्रेरणा उत्सवासाठी स्थानिक श्रीमती राधादेवी बाकलीवाल कन्या विद्या निकेतनची विद्यार्थीनी दिशा विजय जोगदंड हिची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील केवळ २ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.
 
 
lp
 
 
 
प्रेरणा उत्सव हा प्रामुख्याने शिक्षण आणि कौशल्य विकासावर केंद्रीत असलेला अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत राबविण्यात येत असून, यामध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यावर भर दिला जातो. यासाठी प्रथम जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येतात. सत्र २०२५-२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत श्रीमती राधादेवी बाकलीवाल कन्या विद्या निकेतनची विद्यार्थीनी दिशा विजय जोगदंड हिने प्रथम स्थान प्राप्त केले आहे.
 
 
महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिशाची निवड आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मगाव असलेल्या गुजरात येथील वडनगर होणार्‍या ८ दिवशीय प्रशिक्षणासाठी झाली आहे. दिशाने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडीलांसह श्री बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंदकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक धनंजय वानखेडे, शिक्षक विनायक उज्जैनकर, मनिष सदाफळे, ज्ञानेश्वर वाकुडकर, शुभम गोटे, मयुरी डहाळे, रोहिणी ठोके, रोशनी अंभोरे, मोहीनी अहाळे, संतोष फुरसुले, प्रफुल्ल काळे, लक्ष्मण भगिरथे, आकाश भगिरथे यांना दिले आहे. दिशा जोगदंड ही आता पुढील प्रशिक्षणासाठी ९ एप्रिल रोजी वडनगर येथे शिक्षिका मोहीनी अहाळे यांच्यासह रवाना होणार आहे.
Powered By Sangraha 9.0