महागाव सभापती निवडीत उबाठा सेनेचा वरचष्मा

06 Mar 2026 21:53:43
तभा वृत्तसेवा
महागाव, 
election-of-mahagaon-speaker : महागाव नगरपंचायतच्या विषय समितीच्या निवडीत उबाठा शिवसेनेचा वरचष्मा राहिला. महत्वाच्या नियोजन, बांधकाम व आरोग्य समितीवर त्यांचा झेंडा फडकला असून काँग्रेस बंडखोर नगरसेवकाची एकही समितीवर वर्णी लागली नाही.
 
 
 
y6March-Niwad
 
 
 
महागाव नगर पंचायत अध्यक्षपदी भाजपाच्या रंजना दीपक आडे यांची बहुमताने निवड झाल्यानंतर गुरुवार, 5 मार्च रोजी नपं सभागृहात विषय समित्यांची निवड पार पडली. यामध्ये स्थायी, नियोजन, बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य समितीच्या अध्यक्ष, सभापती यांची निवड करण्यात आली.
 
 
यामध्ये स्थायी समिती अध्यक्षपदी नपं अध्यक्ष रंजना आडे, नियोजन सभापती नपं उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे, बांधकाम समिती सभापती विशाल पांडे, पाणी पुरवठा समिती सभापती सुरेश नरवाडे आणि आरोग्य सभापतीपदी सुनीता शिवाजी डाखोरे यांची निवड करण्यात आली.
 
 
भाजपाच्या रंजना आडे अध्यक्ष होण्यासाठी उबाठा शिवसेना नगरसेवक व काँग्रेसचे बंडखोर परवेज सुरय्या, जयश्री संजय नरवाडे, जयश्री इंगोले यांनी भाजपाशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे सभापतीपदी बंडखोर काँग्रेस नगरसेवकांची वर्णी लागण्याची शक्यता असताना, ऐनवेळी उबाठा शिवसेनेने तीन महत्वाच्या समित्यांवर आपला झेंडा फडकविल्याने सत्तेत त्यांचा दबदबा कायम राहिला.
 
 
यावेळी मुख्याधिकारी अजय कुरवाडे, नपं अध्यक्ष रंजना आडे, नपं उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. या निवडीबद्दल माजी आमदार विजय खडसे, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, भाजपा शहराध्यक्ष निलेश नरवाडे, माजी तालुकाध्यक्ष दीपक आडे, फुलसावंगी मंडळ अध्यक्ष योगेश वाजपेयी, नगरसेवक सुजित ठाकूर यांनी सर्व सभापतींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0